शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून पोलीस उपायुक्त रौशन यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 20:24 IST

भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील चार पोलीस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले. या यादीत रौशन यांचेही नाव आहे.

ठळक मुद्देअनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा : उस्मानाबाद अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांची नागपुरातून बदली झाली आहे. भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील चार पोलीस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी जारी केले. या यादीत रौशन यांचेही नाव आहे.आयआयटी खरगपूरचे विद्यार्थी असलेले उपायुक्त रौशन यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रीकल्सचा अभ्यासक्रम २००७ मध्ये पूर्ण केला. चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये ते नागपुरात बदलून आले. वर्षभराच्या कालावधीत हसतमुख, मितभाषी आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांना प्रारंभी वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी जबाबदारी सोपविली होती. फेब्रुवारी २०१९ पर्यंत अर्थात् सहा महिन्यांच्या सेवाकाळात नागपुरातील विस्कळीत वाहतुकीला लगाम घालण्याची जबाबदारी रौशन यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. त्यानंतर त्यांना परिमंडळ चारचे उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. येथेही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. कोणत्याही गुन्ह्याचा तपास खोलात जाऊन करण्याची त्यांची शैली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावतानाच त्यांनी आपल्या नागपुरातील १२ महिन्याच्या सेवाकाळात घरून निघून गेलेल्या, फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या ५५० अल्पवयीन मुलामुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या हवाली करण्याची कामगिरी बजावली.गृह विभागाने राज्यातील चार अधीक्षक / पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यात उपायुक्त रौशन यांचेही नाव आहे.अतिरिक्त अधीक्षक अन् अधीक्षक२०१३ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले रौशन यांनी परभणीला प्रशिक्षणार्थी सेवाकाळ पूर्ण केला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये उस्मानाबादला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर त्यांची याच पदावर वसईला बदली झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये ते नागपुरात बदलून आले आणि आता वर्षभराच्या सेवाकाळानंतर ते आता उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली