शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केवळ २३,५०० रुपयांची कॅश, एकूण सव्वा पाच कोटींची संपत्ती

By योगेश पांडे | Updated: October 25, 2024 18:03 IST

संपत्तीत पाच वर्षांत २३ टक्क्यांनी वाढ : शपथपत्रात चार प्रलंबित प्रकरणांची नोंद

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या एकट्याच्या नावावर सुमारे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत उपमुख्यमंत्र्यांची संपत्ती ही २३ टक्क्यांनी वाढली आहे. प्रामुख्याने जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या ५ वर्षांत झालेल्या वाढीमुळे अचल संपत्तीत वाढ झाली आहे.

२०१९ साली उपमुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिकरीत्या ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची चल संपत्ती व ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची अचल संपत्ती होती. एकूण संपत्तीचा आकडा हा ४ कोटी २४ लाख २३ हजार ६३४ इतका होता. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ५६ लाख ०७ हजार ८६७ रुपयांची चल तर ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.

त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर २०१९ साली ४ कोटी ३८ लाख ९७ हजार ७४१ रुपयांची संपत्ती होती. ती आता वाढून ७ कोटी ९२ लाख २१ हजार ७४८ इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत ८०.४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्या नावावर ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपयांची चल तर ९५ लाख २९ हजारांची अचल संपत्ती आहे. फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्याकडूनच ६२ लाखांचे कर्ज घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.

न्यायालयात चार प्रलंबित प्रकरणे

फडणवीस यांनी शपथपत्रात चार प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविरूद्ध एकही गुन्हा (एफआयआर) दाखल नाही. या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या चार खाजगी तक्रारींपैकी २ तक्रारी सतीश उके यांनी केल्या असून, एक तक्रार मोहनीश जबलपुरे यांची आहे.

फडणवीसांपेक्षा पत्नीची वार्षिक मिळकत अधिकदेवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा व्यवसाय शेती व समाजसेवा हा दाखविला आहे. त्यांची वार्षिक मिळकत ३८ लाख ७३ हजार ५६३ रुपये इतकी होती. तर त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता यांची वार्षिक मिळकत अधिक आहे. २०२३-२४ मध्ये अमृता यांची वार्षिक मिळकत ७९ लाख ३० हजार ४०२ इतकी होती. वेतन, शेअर्समधील कॅपिटल गेन, डिव्हिडेंट इत्यादींचा त्यात समावेश होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर