शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

डीव्हीआर प्रकरणी एसडीओ, तहसीलदार यांची विभागीय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:26 IST

उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार आणि एका नायब तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक (पीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांची एक वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड येथील डीव्हीआर चोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार आणि एका नायब तहसीलदारांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक (पीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांची एक वेतनवाढ रोखण्यात आल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघात मतदान झाल्यावर इव्हीएम ठेवण्यासाठी उमरेड येथील आयआयटीच्या परिसरात तात्पुर्ती स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली होती. येथून इव्हीएम कळमना येथील मुख्य स्ट्रॉंग रूम येथे हलविण्यात आले. त्यानंतर उमरेड येथील स्ट्रॉंगरूममध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि एलसीडी स्क्रीन चोरीस गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी १२ दिवसानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. तक्रारीत एक डीव्हीआरचा उल्लेख होता. चोरट्यांनी मात्र दोन डीव्हीआर दिले. एलसीडी स्क्रीन मात्र मिळाली नाही. कॉंग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली. त्यानंतर निवडणूक आयोगाचे दोन सदस्यीय पथक तपासणी करण्यासाठी आले. तपासणीत त्यांना महसूल आणि पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा लक्षात आला. तसा अहवाल मुख्य निवडणूक आयोगाला दिल्याची माहिती आहे. त्यानुसार आयोगाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Electionनिवडणूकtheftचोरी