शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने वाढविली चिंता, ५६५ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाची दहशत कमी झाली असताना डेंग्यूने मात्र ती वाढविली आहे. शहरात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे घराघरात रुग्ण ...

नागपूर : कोरोनाची दहशत कमी झाली असताना डेंग्यूने मात्र ती वाढविली आहे. शहरात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे घराघरात रुग्ण आढळून येत आहेत. धक्कादायक म्हणजे, जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात डेंग्यू अळी आढळून येणाऱ्या घरांच्या संख्येत १२४ टक्क्याने वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. डेंग्यूचे आतापर्यंत ५६५ रुग्णांची नोंद झाली आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास दुपटीने रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

एक डास माणसाची किती दाणादाण उडवितो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव मागील नऊ वर्षांपासून नागपूरकर अनुभवत आहेत. शहरात पहिल्यांदाच २०१२ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक २३७ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये २४०, २०१४ मध्ये ६०१, २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५, २०१७ मध्ये १९९, २०१८ मध्ये ५६५, २०१९ मध्ये सर्वाधिक ६२७, २०२० मध्ये सर्वात कमी १०७, तर २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ५६५ रुग्णांची नोंद झाली. पाऊस लांबल्यास यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- २५ दिवसात डेंग्यूचे २१६ रुग्ण

डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरात जानेवारीत २, फेब्रुवारीत १, मार्चमध्ये ३, मेमध्ये ६, जूनमध्ये ८६, जुलैमध्ये २५१ तर २५ ऑगस्टपर्यंत २१६ रुग्णांची भर पडली. आतापर्यंत ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

- डेंग्यूचे रुग्ण पॉश वसाहतींमध्येही

डेंग्यूचे रुग्ण केवळ स्लम वसाहतीतच आढळून येत नाही आहे, तर पॉश वसाहतींमध्येही दिसून येत आहेत. मागील सात महिन्यात लक्ष्मीनगर झोनमध्ये ५२, धरमपेठ झोनमध्ये ६०, हनुमाननगर झोनमध्ये ९६, धंतोली झोनमध्ये ३८, नेहरूनगर झोनमध्ये १११, गांधीबाग झोनमध्ये ४२, सतरंजीपुरा झोनमध्ये ६८, लकडगंज झोनमध्ये ३३, आसीनगर झोनमध्ये ३०, मंगळवारी झोनमध्ये ३५ रुग्ण आढळून आले आहेत.

- दूषित घरांची संख्या कमी होईना

महानगरपालिकेने १६ जुलैपासून विशेष सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. त्यात जुलै महिन्यात ५,९३५ दूषित घरे, म्हणजे या डेंग्यू अळी आढळून आल्या तर ऑगस्ट महिन्यात १३,२९७ घरे दूषित आढळून आली. तब्बल १२४ टक्क्याने वाढ झाली. सर्वाधिक ५,३६७ दूषित घरे नेहरूनगर झोनमध्ये आहेत. मनपाच्या सर्वेक्षणात साचलेले पाणी फेकून दिले जात असताना किंवा त्यात कीटकनाशक औषधी किंवा गप्पीमासे सोडले जात असतानाही दूषित घरांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

- डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक

डेंग्यू नियंत्रणात येऊ शकतो. यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणे आवश्यक आहे. घरात पाणी जमा होऊ न देणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, रात्री व दिवसाही मच्छरदाणीचा वापर करणे, मोठ्यांसोबतच मुलांचे पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालणे आदी उपाययोजना केल्यास डेंग्यूचा प्रभाव कमी करता येऊ शकतो.

- दीपाली नासरे, अधिकारी हिवताप व हत्तीरोग विभाग मनपा

जुलै ते २५ ऑगस्टपर्यंत

झोन: तपासलेली घरे : दूषित घरे

लक्ष्मीनगर :१९,९८८ : ५८८

धरमपेठ : २१,४२४ : ८१२

हनुमाननगर :३४,२९८ : १५०६

धंतोली : ३२,६५१ : ८२४

नेहरूनगर : ४०,६८३ : ५,३६७

गांधीबाग : १८,६६२ : ९१२

सतरंजीपुरा : २४,९१३ : ८९२

लकडगंज : ३१,२७१ : १२६६

आशीनगर : २८,२७२ : ६८५

मंगळवारी : २२,१६३ : ४४५