विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन

By Admin | Updated: August 15, 2016 01:46 IST2016-08-15T01:46:28+5:302016-08-15T01:46:28+5:30

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व कलाश्रय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी डॉ. विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.

Demonstration of pictures based on the works of Vinod Indurkar | विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन

विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व कलाश्रयचा उपक्रम :
५६ विद्यार्थ्यांनी शब्दांंना बांधले चित्रात
नागपूर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी व कलाश्रय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी डॉ. विनोद इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रा. दीपक जोशी, ललित कला विभागाच्या प्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते, प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने उपस्थित होते. डॉ. विनोद इंदूरकर यांनी प्रास्ताविकात या प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रतिभा कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक राहुल मुडे व अजय महाकाळकरद्वारा प्रायोजित या कार्यक्रमाला नागपुरातील अनेक कलारसिकांनी भेट दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, कलाकार आणि कलारसिक यांच्यामध्ये जवळीक निर्माण करण्याची क्षमता या चित्रांमध्ये आहे. दीपक जोशी म्हणाले, कलावंतांनी कवितेतील आशयाला धरून उत्तम चित्रनिर्मिती केली आहे. यावेळी कलाश्रय ग्रुपचे तसेच ललित कला विभागाचे प्रा. सदानंद चौधरी, प्रा. मौक्तिक काटे, स्नेहल लिमये, सेंट्रल इंडिया स्कूल आॅफ फाईन आर्टस्चे प्रा. बाबर शरीफ, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे, मिलिंद लिंबेकर, डॉ. करिष्मा कांबे, अभिषेक चौरासिया, आनंद डबली, शेखर तांडेकर,महेश मानकर, अमोल हिवरकर, धृपद गाडे, आकाश सूर्यवंशी उपस्थित होते. ७ आॅगस्ट रोजी कलाश्रय व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने डॉ. इंदूरकर यांच्या कवितांवर आधारित चित्रनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत ५६ कलावंतांनी जे चित्र काढले ते या प्रदर्शनात लावण्यात आले आहे. या कार्यशाळेत ललित कला विभाग, शासकीय चित्रकला महाविद्यालय, सेंट्रल इंडिया स्कूल आॅफ फाईन आर्टस्, तसेच शरद पवार चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)

 

Web Title: Demonstration of pictures based on the works of Vinod Indurkar