शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

क्रांतियात्रेतून ज्योतिबा व सावित्रीआई यांना भारतरत्न देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:21 IST

सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिसूर्य व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवाव्रत स्वीकारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीआई यांच्या अजोड कार्याने देशात सामाजिक क्रांतीची बिजे रोवली. त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गौरव करावा, अशी मागणी जोर धरत आहे. बुधवारी महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मागणीसाठी सर्व समाज संघटनांच्यावतीने भव्य क्रांतियात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्दे६० चित्ररथातून घडविले जीवनदर्शन : सर्व समाज संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिसूर्य व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवाव्रत स्वीकारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीआई यांच्या अजोड कार्याने देशात सामाजिक क्रांतीची बिजे रोवली. त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गौरव करावा, अशी मागणी जोर धरत आहे. बुधवारी महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मागणीसाठी सर्व समाज संघटनांच्यावतीने भव्य क्रांतियात्रा काढण्यात आली.महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने राष्ट्रीय  ओबीसी महासंघ, मराठा सेवा संघ, अ.भा. माळी महासंघ, बानाई यांच्यासह बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ४० च्या जवळपास सामाजिक संघटनांच्या सहभागाने महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग येथून ही क्रांतियात्रा काढण्यात आली. ज्योतिबा व सावित्रीआई यांच्यासह शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविणारे ६० चित्ररथ या यात्रेत सामील होते. चंदननगर, क्रीडा चौक,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, मानेवाडा चौक, उदयनगर, जुना सुभेदार, सक्करदरा चौक, हेडगेवार स्मारक मार्गे रेशीमबागच्या सभागृहात समारोप करण्यात आला. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, अविनाश ठाकरे, डॉ. गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, संजय आवटे, डॉ. पी.एस. चंगोले, अशोक चोपडे यांनी  उदबोधन  केले.या आयोजनात संस्थेचे डॉ. शेषराव उमप, सुरेंद्र आर्य, रवींद्र अंबाडकर, रमेश राऊत, प्रकाश देवते, धनराज फरकाडे, मुकेश घोळसे, अरुण भोयर, शरद चांदोरे, गिरीश देशमुख, नीलय चोपडे, घनश्याम खवले, राजू गाडगे, राजेंद्र पाटील, सुनील चिमोटे, शंकर घोळसे यांचा सहभाग होता. यासह माजी आमदार अशोक मानकर, मोहन मते, आमदार सुधाकर कोहळे, बळवंत जिचकार, कैलास चुटे, नगरसेवक प्रवीण दटके, रमेश सिंगारे, उषा पॅलेट, शीतल प्रशांत कामडे, स्वाती आखतकर, पिंटू झलके, डॉ. छोटू भोयर, सतीश होले, विशाखा मोहड, आरती बुंदे, संजय महाकाळकर, मनोज गावंडे, डॉ. शरयू तायवाडे, सुषमा भड, निर्मला मानमोडे, कल्पना मानकर, वृंदा ठाकरे, सुनीता जिचकार, अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, साधना बोरकर आदींचा सहभाग होता.

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक