शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात  धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा शिवसेना,भाजप व मनसे पक्षाच्या आमदारांनी दिला.

ठळक मुद्देराज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा शिवसेना,भाजप व मनसे पक्षाच्या आमदारांनी दिला. या पक्षाच्या आमदारांनी या मागणीसाठी बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यावर सामूहिक आंदोलन केले. विधिमंडळात हा कायदा लागू करण्याची मागणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आमदार रवींद्र फाटक, मंगेश कुडाळकर, रूपेश म्हात्रे, सुभाष साबणे, राजन साळवी, राहुल पाटील, गौतम चाबुकस्वार, अशोक पाटील, भाजपचे आमदार महेश चौगुले आणि मनसेचे आमदार शरद सोनावणे यांचा सहभाग होता. या आमदारांनी यावेळी तीव्र नारेबाजी केली. यावेळी शिवसेनेचे उपनेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलनाला भेट दिली.भरतशेठ गोगावले यांनी सांगितले, काही महिन्यापूर्वी मुंबई, वांद्रे येथील हिंदू मॉडेल रश्मी शहाबाजकर हिला तिच्या मुसलमान नवºयाने धर्मांतर करण्यासाठी बेदम मारहाण केली होती. रश्मी शहाबाजकर हिने इस्लाम पंथात धर्मांतर न केल्यामुळे तिला तलाक देऊन त्याने दुसरा विवाहही केला. मुंबईसह महाराष्ट्रभरात हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. मुंबईतील झाकीर नाईकच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडशेन’ संस्थेच्या कल्याण येथून अटक केलेल्या रिझवान खान आणि अर्शिद कुरेशी या कार्यकर्त्यांनी सुमारे ८०० जणांचे फसवून आणि प्रलोभन देऊन धर्मांतर केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने केलेल्या तपासात उघड झाले आहे. या धर्मांतरितांना आयएसआयएस (इसिस) या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेत भरती करण्याचा त्यांचे षड्यंत्र होते असा संशय आहे. तसेच महाराष्ट्रातील आदिवासी आणि ग्रामीण भागात ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर गरीब आदिवासींचे धर्मांतर केले जात असते. यापूर्वीच्या काँग्रेस शासनाने न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती नेमली होती. या समितीने मध्य प्रदेश आणि ओडिसा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाला केली होती. ती शिफारस स्वीकारून हा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी या आमदारांनी केली.

 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर