शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

गळणारे छत, शेवाळं असलेल्या भिंतींच्या कक्षात होते प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:47 IST

‘सन्मानपूर्वक प्रसुती’ आणि अशा प्रसुतीसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण सुश्रुषा शासकीय रुग्णालयात मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क असल्याचे खुद्द शासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमनपा इंदिरा गांधी रुग्णालयाची विदारक स्थितीमहिन्याकाठी होतात १० वर प्रसुतीअधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा कळस

सुमेध वाघमारे/दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाळंतपणानंतर होणारा रक्तस्राव, रक्तदाबाशी निगडित समस्या आणि जंतुदोष (सेप्सिस) ही मातामृत्यूंची प्रमुख कारणे आहेत, तर दुसरीकडे ‘सन्मानपूर्वक प्रसुती’ आणि अशा प्रसुतीसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण सुश्रुषा शासकीय रुग्णालयात मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क असल्याचे खुद्द शासनाचे म्हणणे आहे. मात्र मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाला या बाबीचे काहीही सोयरसुतक नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. गळणारे छत, शेवाळ लागलेल्या भिंती, कोंदट वातावरण असलेल्या अस्वच्छ प्रसुती कक्षात महिलांची प्रसुती केली जात आहे. मनपाचा आरोग्यबाबतच्या अनास्थेला गंभीरतेने घेतो कोण, असा प्रकार सुरू आहे.शासन एकीकडे मातामृत्यू रोखण्यासाठी विविध योजना अमलात आणत आहे. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. परंतु नागपुरकरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मनपाला याचा विसर पडला आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातच असुरक्षित बाळंतपण केले जात असल्याचे सामोर आले आहे. या रुग्णालयात ७५ खाटा आहेत. यातील ३० खाटा स्त्री रोग व प्रसुती विभागासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या सेवेत चार स्त्री रोग तज्ज्ञ व एक बालरोग तज्ज्ञ आहे. रुग्णालयाच्या देखभालीवर व डॉक्टरांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च होत असताना साधे प्रसुती कक्ष दुरुस्त होत नसल्याने आश्चर्य आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयाची जबाबदारी असलेल्या अधिकाºयाचेच रुग्णालयाच्या विकासकामाकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.

महिन्याकाठी १० वर प्रसुतीरुग्णालयातील तळमजल्यावर स्त्री रोग व प्रसुती विभागाचा बाह्यरुग्ण विभागातच प्रसुती कक्ष आहे. या कक्षाचे छत गेल्या कित्येक वर्षांपासून गळत आहे. भिंती ओलावा पकडून ठेवत असल्याने शेवाळ लागले आहे. विद्युत व्यवस्थेची पुरेशी सोयही नाही. जंतु संसर्गाचा धोका असलेल्या या कक्षात महिन्याकाठी १०वर प्रसुती होतात. गेल्या चार-पाच वर्षापासून याच स्थितीत हा कक्ष असल्याने रुग्णालयाची जबाबदारी असलेल्या अधिकाºयाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

प्रसूत माता व अर्भकांचा जीव धोक्यातप्रसूती कक्षाचे सर्व निकष धाब्यावर बसून माता व अर्भकाचा जीव धोक्यात आणणाºया या कक्षात गेल्या तीन वर्षात ५६७ प्रसूती झाल्या. २०१६-१७ मध्ये १६८, २०१७-१८ मध्ये १८०, २०१८-१९मध्ये २०२ तर एप्रिल व मे या दोन महिन्यात १७ प्रसूती झाल्या आहेत. या प्रकारामुळे दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा उद्देश बाळगून असलेल्या मनपाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य