शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ऑनलाईन खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या डिलेव्हरी बॉयची आरोग्य ...

ठळक मुद्दे अन्न व औषधी विभागाचा आदेश : ग्राहकांची सुरक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ऑनलाईन खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी बंधनकारक केली आहे. ही तपासणी शासकीय वा खासगी रुग्णालयात करता येईल. यासंदर्भात विभागाने झोमॅटो, स्वीगी, उबेर इट्स या कंपन्यांना पत्र पाठविल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.सध्या खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन डिलेव्हरीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी लागणारे वेटिंग पाहता लोकांनाही ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्याला पसंती दिली आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एफडीएने डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी बंधनकारक केली आहे. फूड डिलेव्हरी बॉयला कुठला आजार किंवा संसर्गजन्य आजार आहे वा नाही, हे तपासण्याची यंत्रणा एफडीएकडे नाही. त्यामुळे हॉटेल ते थेट ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी ज्या डिलेव्हरी बॉयवर आहे, त्याच्या आरोग्य तपासणीचे आदेश नागपूरच्या एफडीए विभागाने दिले आहेत.धावपळीच्या काळात ग्राहकांकडून ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून ऑर्डर मिळाल्यानंतर ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचविण्याची जबाबदारी फूड डिलेव्हरी बॉयची आहे. ग्राहकांना त्यांचा पत्ता पाहून त्या त्या परिसरातील हॉटेलमधून डिलेव्हरी बॉयच्या माध्यमातून खाद्यपदार्थ पोहोचविण्यात येते. खाद्यपदार्थ पॅकिंगमध्ये असले तरीही डिलेव्हरी बॉय हॉटेलमधून पॅकिंग घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवून देईपर्यंत स्वत: हाताळतो. डिलेव्हरी बॉय हा हॉटेल आणि ग्राहकांमधील मोठा दुवा आहे. तो वैद्यकीयरीत्या फिट असावा, यावर एफडीए आग्रही आहे.ऑनलाईन खाद्यापदार्थ मागविण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. लहानांपासून वयस्कांपर्यंत सर्वांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. ग्राहकांना शुद्ध आणि पोषक खाद्यपदार्थ मिळावे, या दृष्टिकोनातून एफडीएने कंपन्यांना पत्र पाठवून डिलेव्हरी बॉयच्या आरोग्य तपासणीवर भर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नाव न सांगण्याच्या अटीवर एका डिलेव्हरी बॉयने सांगितले की, एफडीएचे आदेश आम्हाला मान्य आहे. पण तपासणीचा खर्च कंपनी वा कंत्राटदाराने करावा. या व्यवसायात युवक रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.प्रमाणपत्र एफडीएकडे जमा करणे अनिवार्यऑनलाईन खाद्यपदार्थांची डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्या झोमॅटो, स्वीगी, उबेर इट्स यांना पत्र दिले आहे. या कंपन्यांनी खाद्यपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांकडे असलेल्या डिलेव्हरी बॉयची आरोग्य तपासणी करायची आहे. तपासणी केल्याचे प्रमाणपत्र एफडीएकडे जमा करणे अनिवार्य आहे. यामुळे लोकांना पोषक खाद्यान्न मिळेल.मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न)अन्न व औषधी प्रशासन विभाग.

टॅग्स :onlineऑनलाइनfoodअन्नFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग