शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

ंअपंग व्यक्तीचा अर्ज घेण्यास म्हाडाकडून नकार

By admin | Updated: May 31, 2015 02:52 IST

नागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत समाधान शिबिर लावले असले तरी शासकीय अधिकारी-कर्मचारी किती उदासीन आहेत,

कमलेश वानखेडे  नागपूरनागरिकांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत समाधान शिबिर लावले असले तरी शासकीय अधिकारी-कर्मचारी किती उदासीन आहेत, याचे आणखी एक उदाहरण समाधान शिबिरातच पहायला मिळाले. अंबाझरी येथील रहिवासी आशीष गजभिये या अपंग व्यक्तीने म्हाडाच्या काऊंटर क्रमांक ८ वर दुपारी ३ वाजता अर्ज दिला असता तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळ संपल्याचे सांगून अर्ज घेण्यास नकार दिला. शेवटी अपंग व्यक्तीने गोंधळ घातल्यावर व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर अर्ज स्वीकारण्यात आला.मुख्यमंत्र्यांच्या शिबिरात जर अधिकारी-कर्मचारी असे प्रकार करीत असतील तर इतरवेळी ते नागरिकांचे खरच समाधान करीत असतील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.शिबिरासाठी २५ तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्यांना टोकन क्रमांक देण्यात आले होते. तर शनिवारी वेळेवर येणारे अर्ज दुपारी ४ पर्यंत स्वीकारले जातील व त्यावरील कार्यवाही २० जूनपर्यंत केली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी बरेच नागरिक आपापले अर्ज घेऊन शिबिर स्थळी आले. त्यांचे अर्ज स्वीकारण्यातही आले. दुपारी ३ वाजता अपंग असलेले अंबाझरी येथील रहिवासी आशीष गजभिये व अनुप खांडेकर हे शिबिर स्थळी नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) च्या ८ नंबर काऊंटरला गेले. गोधणी येथे एमआयजी २० योजनेंतर्गत त्यांना म्हाडाचा भूखंड मिळाला आहे. गेल्या चार वर्षांपासून ते म्हाडाच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांना अद्याप परवानगी मिळाली नाही. शिबिरात दुपारी ३ वाजता अर्ज द्यायला गेले असता गजभिये व खांडेकर या दोघांचाही अर्ज घेण्यास उपस्थित अधिकाऱ्यांनी नकार दिला. आतापर्यंत आलेल्या १८ अर्जांची माहिती आम्ही वरती पाठविली आहे. त्यामुळे आता तुमचा अर्ज घेता स्वीकारता येणार नाही. अर्ज स्वीकारला तर पुन्हा माहिती पाठवावी लागेल, असे कारण अधिकाऱ्यांनी दिले. यावर अपंग असलेले गजभिये यांनी अधिकाऱ्यांना वारंवार विनंती केली. पण कुणीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यांची साधी दखलही घेतली जात नव्हती. यामुळे गजभिये यांनी गोंधळ घातला. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जमले व विचारणा करू लागले. हे पाहून एक वरिष्ठ अधिकारी तेथे आले व त्यांनी अर्ज स्वीकारण्याची सूचना केली. त्यानंतर कक्षात उपस्थित अधिकाऱ्यांनी अनिच्छेने अर्ज स्वीकारला.