शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण, दोषींना १० वर्षांची शिक्षा : नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 21:10 IST

गेल्या काही दिवसात समोर आलेल्या विविध घटनेत मेट्रो पिलर, स्टेशन, सुरक्षा भिंत, पिलरमधील दुभाजक इत्यादींवर रंगरंगोटी करणे, पोस्टर चिकटवणे व जाहिराती लिहिणे या सारखे गैरप्रकार होत आहेत.

ठळक मुद्देशहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसात समोर आलेल्या विविध घटनेत मेट्रो पिलर, स्टेशन, सुरक्षा भिंत, पिलरमधील दुभाजक इत्यादींवर रंगरंगोटी करणे, पोस्टर चिकटवणे व जाहिराती लिहिणे या सारखे गैरप्रकार होत आहेत. मेट्रोच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण कुणीही करू नये, यासाठी सातत्याने महामेट्रोतर्फे विविध माध्यमातून सूचना करण्यात येत आहे. मेट्रोशी निगडित कोणत्याही बांधकामांवर असे गैरप्रकार आढळून आल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी कायद्यांतर्गत १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.देश-विदेशात नागपूर शहराचे वैभव दर्शविणारा नागपूर मेट्रो प्रकल्प रहिवाशांसाठी गौरवास्पद बाब ठरली आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी नागपूर मेट्रो आकर्षणाचे केंद्र ठरत असून शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख ठरली आहे.संस्थांसाठी कार्य करणारे तसेच सर्वसामान्य नागरिकांना मेट्रो प्रकल्पांतर्गत मालमत्तेचे व बांधकामांचे (मेट्रो पिलर्स, रेल्वे ट्रॅक, भुयारी मार्ग, स्टेशन इमारत, व्हायाडक्ट) रंग, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग किंवा इतर साधनांचा वापर करून विद्रुपीकरण करणे मेट्रो रेल्वे (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) अधिनियम २००२ च्या कलम ७८ अंतर्गत प्रतिबंधित आहे. या कायद्यानुसार कुणीही या सार्वजनिक संपत्तीचे विद्रुपीकरण केल्यास किंवा करताना आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार मेट्रो अधिकारी अथवा पोलीस अधिकाऱ्यांतर्फे वॉरंट किंवा नोटीस बजावत अटकेची कारवाई केली जाईल. कायद्यानुसार यात दोषींवर १० वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.महाराष्ट्र संपत्ती प्रतिबंधक मालमत्ता अधिनियम १९९५ चे कलम ३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेवर व बांधकामाच्या ठिकाणी, तेथील जागेवर होणारी विटंबना कायद्याने अमान्य आहे. या अधिनियमान्वये संबंधित व्यक्ती, कंपनी, कॉपोर्रेट संस्था तसेच संबंधित अधिकारी किंवा व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती यांच्या संमतीशिवाय गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानुसार नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या मालमत्तेचे विद्रुपीकरण करताना आढळून आल्यास दोषींवर तीन महिने कारावास, २००० रुपये दंड अथवा दोन्ही असे शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे असे कुठलेही विद्रुपीकरण दिसून आल्यास त्वरित महा मेट्रोशी संपर्क करावा, असे आवाहन नागपूर मेट्रोने नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर