शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 11:32 IST

नागपूर-उमरेड महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर चितळाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील चक्रीघाटलगतच्या हेटी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देहेटी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-उमरेड महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर चितळाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील चक्रीघाटलगतच्या हेटी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. दिवसेंदिवस कमी होत असलेल्या बाराशिंगे चितळाचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.उमरेड-नागपूर महामार्गावरील हेटी परिसरात सदर चितळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. यात चितळ ठार झाले. सदर चितळ महामार्गालगतच्या पारडगाव तलावाच्या दिशेने जात होते, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली.याबाबत माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक मंगेश ठेंगडी, उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. बी. वाघ, मकरधोकडा क्षेत्र सहायक इद्रिस शेख यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर उटी परिसरातील नर्सरीमध्ये पशुधन पर्यवेक्षक पी. एम. कुमरे यांनी मृत नर चितळाचे शवविच्छेदन केले. या चितळाची लांबी १९० सेमी असून त्यांची बाराशिंगे शाबूत होती. याप्रकरणी उत्तर उमरेड वनविभागाने अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Accidentअपघात