शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गोरेवाडा जंगलात हरणाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 23:19 IST

गोरेवाडा वनक्षेत्राला लागून असलेल्या मनपा वॉटर प्लान्ट परिसरात एका हरणाची शिकार करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

ठळक मुद्देमांस चोरून नेण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरेवाडा वनक्षेत्राला लागून असलेल्या मनपा वॉटर प्लान्ट परिसरात एका हरणाची शिकार करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.गोरेवाडा वॉटर प्लान्ट ते तलावाच्या काठाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना पाण्यात एका हरणाचा मृतदेह आढळून आला. हरणाचे तोंड, मागचे दोन पाय कापून चार भागामध्ये हरणाचा मृतदेह पडला होता. त्यामुळे एखाद्याने हरणाची शिकार करण्याची शंका निर्माण झाली. हरणाच्या पोटाचा भाग हा बिबट किंवा अन्य प्राण्याने खाल्ल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. परंतु ज्या पद्धतीने हरणाचे तोंड व पाय सफाईने कापण्यात आले आहे, त्यावरून हरणाचे मांस चोरण्याचा प्रयत्न झाल्याचेही नाकारले जाऊ शकत नाही. वन अधिकारी मात्र बिबट्याने शिकार केल्याचा दावा करीत आहे. गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या मनपाच्या परिसरात बिबट्याची उपस्थिती अनेकदा आढळून आली आहे. बिबट्याने हरणाची शिकार करून त्याच्या पोटाचा भाग खाल्ला असावा आणि त्यानंतर कुणीतरी कुऱ्हाड किंवा इतर धारदार शस्त्राने हरणाला कापून मांस घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु मांस खराब झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने मांसाचे तुकडे तलावाच्या काठावरच फेकले असावे, असा अधिकाºयांना संशय आहे.पंचनामा करून केले सूचितगोरेवाडाचे आरएफओ सुनील सोनटक्के यांनी सांगितले की, सूचना मिळाल्यावर वन कर्मचाऱ्यासह ते घटनास्थळी पोहोचले. तिथे हरणाचा मृतदेह तुकड्यात पडला होता. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. परंतु संबंधित क्षेत्र हे मनपा वॉटर प्लान्टच्या अधिकार क्षेत्रात येते. उपरोक्त क्षेत्र आणि पूर्ण शहरी परिसर प्रादेशिक वन विभागाच्या सेमिनरी हिल्स रेंज अंतर्गत येत असल्याने त्यांना सूचना देऊन बोलावण्यात आले होते. नियमानुसार घटनेचा पंचनामा आणि पीआर फाडण्याची जबाबदारी सेमिनरी हिल्सच्या कर्मचाऱ्याची होती. मृतदेहाचे अंत्यसंस्कारही करायला हवे होते. परंतु सेमिनरी हिल्सचे कर्मचारी हरणाचा मृतदेह मनपा कर्मचाऱ्याच्या भरवशावर सोडून निघून गेले. गोरेवाडा व मनपा कर्मचाऱ्यानी अंत्यसंस्कार केले.आमचेही कर्मचारी होते उपस्थितसेमिनरी हिल्सचे आरएफओ विजय गंगावणे यांनी सांगितले की, घटनास्थळाला लागूनच गोरेवाडा जंगलाची हद्द आहे. मनपा क्षेत्राला लागून सेमिनरी हिल्सचाही परिसर येतो. आम्हीही पंचनामाची कारवाई केली. मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्यावेळी सेमिनरी हिल्सचे कर्मचारीही उपस्थित होते. हरणाला कापून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्याचे पाहता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी टाळाटाळ करण्यात आली. अखेर गोरेवाडा वनक्षेत्रातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मनपा कर्मचाऱ्यानी खड्डा खोदून हरिणीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Gorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालयnagpurनागपूर