शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसंदर्भात होणार सखोल संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:20 IST

विदर्भातील जंगलांमधील वन्यप्राण्यांसंदर्भात सखोल संशोधन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार २०१९ ते २०२८ या कालावधीत वन्यजीवांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वनरक्षक पदापर्यंतचे सर्व स्तरातील कर्मचारी या संशोधनात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात वन विभागाने वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी सामंजस्य करार केला आहे.

ठळक मुद्देकार्यशाळेचे आयोजन : वन विभागाचा वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील जंगलांमधील वन्यप्राण्यांसंदर्भात सखोल संशोधन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार २०१९ ते २०२८ या कालावधीत वन्यजीवांचा सर्वांगीण अभ्यास केला जाणार आहे. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वनरक्षक पदापर्यंतचे सर्व स्तरातील कर्मचारी या संशोधनात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात वन विभागाने वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी सामंजस्य करार केला आहे.गुरुवारी वन भवनात याबाबतच्या सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संशोधकांची कार्यशाळा घेण्यात आली. तीन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये आणि अभयारण्ये यामधील वाघ तसेच इतर प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. या प्राण्यांचे अधिवास, त्यांना उपलब्ध असलेली शिकार, त्यांच्या संचाराची क्षेत्रे, त्यांचे वर्तन अशा सर्व बाबींचा अभ्यास केला जाईल. या टप्प्यातील संशोधन १० वर्षांपर्यंत चालणार आहे. संशोधनाच्या दुसऱ्या भागात मोठ्या मांसभक्षी प्राण्यांचा अभ्यास चार वर्षांपर्यंत केला जाईल. मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांचा अभ्यास आणि त्या टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांचा या अभ्यासात समावेश असेल. वाघांची वाढती संख्या, जंगलांची वाघ, बिबटे, अस्वल अशा प्राण्यांना सामावून घेण्याची क्षमता, नव्या जंगलांमध्ये वाघांचे स्थलांतर अशा गोष्टींचा अभ्यास केला जाईल. याशिवाय वन विभागाच्या वतीने संशोधनावर आधारित स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले जाईल. संशोधन प्रकल्प आणि त्यासंबंधीची सर्व माहिती या पोर्टलवर टाकली जाईल. वन विभाग आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातील कराराला फेब्रुवारी महिन्यात अंतिम स्वरूप देण्यात आले. गुरुवारी नागपुरात सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संशोधक यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रकल्पाच्या विविध घटकांवर चर्चा करण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प राज्याच्या वन विभागाच्या वतीनेच राबविला जाणार आहे. त्यामुळे, अधिकाऱ्यांपासून वनरक्षकांपर्यंतचे विविध घटक संशोधनात प्रत्यक्ष भाग घेतील. दहा वर्षांचा प्रकल्प हा विदर्भात राबविला जाईल, तर चार वर्षांचा मांसभक्षींचा अभ्यास आणि वेब पोर्टल हे प्रकल्प संपूर्ण राज्यभराकरिता राबविले जातील. वन भवन येथे झालेल्या कार्यशाळेला भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक डॉ. व्ही. बी. माथूर, वन विभागाचे प्रमुख उमेश अग्रवाल, वन्यजीव विभागाचे प्रमुख नितीन काकोडकर तसेच विविध व्याघ्र प्रकल्पांचे आणि वनक्षेत्रांचे प्रमुख उपस्थित होते.

 

टॅग्स :forestजंगलResearchसंशोधन