लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळेल, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले. संस्थेला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ बनविण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारदेखील सकारात्मक आहे. ‘एलआयटी’ला ‘आयआयटी’ हून मोठी जागतिक शिक्षण संस्था बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी ‘एलआयटी’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘ग्लोबल अॅल्युमनी मीट-२०१८’चे आयोजन उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.‘एलआयटी’च्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी, ‘एलआयटी’चे संचालक डॉ.राजू मानकर, माजी प्र-कुलगुरू डॉ.महेशकुमार येन्की, उद्योगपती लोकसारंग हरदास, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजय देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘एलआयटी’ने जगभरात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे येथील संशोधन हे आहे. ‘एलआयटी’ने देशाच्या विकासात मौलिक योगदान दिले आहे. संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जगभरात आपल्या कर्तृत्वाने प्रगतीची शिखरे गाठत आहेत. वर्तमान काळात संशोधनावर जास्त भर देण्यात येत आहे. ‘इनोव्हेशन’ची आवश्यकता दिसून येत आहे. या आवश्यकता ‘एलआयटी’कडून पूर्ण करण्यात येईल. ‘एलआयटी’ला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ बनविण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्यासाठी तत्पर रहावे, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी संघटनेची स्मरणिका ‘लीटा संवाद’चे विमोचन करण्यात आले.नवरत्नांचा सन्मान
‘एलआयटी’ला लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:27 IST
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळेल, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले. संस्थेला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’ बनविण्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारदेखील सकारात्मक आहे. ‘एलआयटी’ला ‘आयआयटी’ हून मोठी जागतिक शिक्षण संस्था बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी ‘एलआयटी’च्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे ‘ग्लोबल अॅल्युमनी मीट-२०१८’चे आयोजन उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
‘एलआयटी’ला लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा
ठळक मुद्देनितीन गडकरींचे संकेत : ‘ग्लोबल अॅल्युमनी मीट’चे झाले उद्घाटन