भाजपा व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपा व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा आणि नागपूर शहरातील विविध असोसिएशनने आपापल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत दिले. यावेळी आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. परिणय फुके आणि भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय वाधवानी, महामंत्री अशोक शनिवारे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व निवेदनांवर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. होलसेल ग्रेन अॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी आणि राईस अॅण्ड ग्रेन ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शनिवारे यांनी तांदूळ आणि कणकी सेसमुक्त करण्याची मागणी केली. धानावर सेसच्या आकारणीनंतर तांदळावर सेस घेऊ नये. नागपूर चिलीज मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद गर्ग व सचिव संजय वाधवानी यांनी लाल मिरची जीएसटीमध्ये करमुक्त करण्याची मागणी केली. कांदे-बटाटे असोसिएशनचे विश्वबंधू गुप्ता यांनी कळमन्यात आकारण्यात येणारे प्रति युनिट १५ रुपये वीजदर कमी करण्याची मागणी केली. कळमन्यात धान्य, मिरची, कांदे-बटाटे बाजारात सर्व असोसिएशनची ९०० दुकाने आहेत. सन १९८६ नंतर नोंदणीकृत विक्रीपत्र अजूनही करून दिलेले नाही, शिवाय सेसचे दर १.०५ टक्क्यांवरून ३५ पैसे करण्याची मागणी केली. आरो चिल्ड वॉटर सप्लाय असोसिएशनचे अध्यक्ष विमल अग्रवाल आणि प्रशांत दहिकर यांनी असोसिएशनच्या सर्व व्यावसायिकांना परवाना द्यावा, कारवाई बंद करावी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्याची मागणी केली.
कळमन्यात वीजदर कमी करा
By admin | Updated: May 25, 2017 02:00 IST