शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्यात डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:38 IST

२०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या मात्र वाढीस : ४६ महिन्यात १७५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुन्या यासारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात या कार्यक्रमांतर्गत २०१९ साली थोडेफार यश मिळाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे. २०१६ सालापासून ३६ महिन्यात १७५ हून अधिक रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. २०१९ साली १० महिन्यात ही संख्या १२ इतकी होती. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.राज्यात डासांमुळे प्रसारित होणाºया रोगांसंदर्भात उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरोग्यविभाग सहसंचालकांकडे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१६ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राज्यात डेंग्यू-हिवताप-हत्तीरोग-चिकनगुन्याचे किती रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत या कालावधीत राज्यात डेंग्यूचे ३५ हजार ५५८ रुग्ण आढळून आले व त्यात १८० रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये ११ हजार ३८ रुग्ण आढळून आले होते व ७० रुग्णांना जीव गमवावा लागला तर २०१९ च्या पहिल्या दहा महिन्यात हीच संख्या ९ हजार ८९९ रुग्ण व १२ मृत्यू इतकी होती.हिवतापावर बऱ्यापैकी नियंत्रणकेंद्र, राज्य शासनाकडून हिवतापावर नियंत्रण यावे यासाठी विविध मोहीम राबविण्यात आल्या. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण २०१६, २०१७, २०१८ च्या तुलनेत कमी झाले आहे. २०१६ मध्ये २३,९८३ रुग्ण व २६ मृत्यू, २०१७ मध्ये १७,७१० रुग्ण व २० मृत्यू तर ७,१७८ रुग्ण व पाच मृत्यू अशी होती. २०१६ च्या तुलनेत रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूDeathमृत्यूRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता