शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणातील प्रवेश रद्द झाल्याचे स्पष्टीकरण देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 20:12 IST

सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गात मोडणाऱ्या मराठा व इतर विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील सर्व प्रवेश रद्द झाल्याचे स्पष्टीकरण देण्याची राज्य सीईटी सेलची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या प्रकरणात पक्षकार नसल्यामुळे असे स्पष्टीकरण देता येणार नसल्याचे सेलला सांगण्यात आले. तसेच, असे स्पष्टीकरण मागितल्यामुळे सेलची कानउघाडणी करण्यात आली.

ठळक मुद्देहायकोर्ट : राज्य सीईटी सेलची विनंती फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गात मोडणाऱ्या मराठा व इतर विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील सर्व प्रवेश रद्द झाल्याचे स्पष्टीकरण देण्याची राज्य सीईटी सेलची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थी या प्रकरणात पक्षकार नसल्यामुळे असे स्पष्टीकरण देता येणार नसल्याचे सेलला सांगण्यात आले. तसेच, असे स्पष्टीकरण मागितल्यामुळे सेलची कानउघाडणी करण्यात आली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी पूर्ण झाली. राज्यात ३० नोव्हेंबर २०१८ पासून एसईबीसी कायदा लागू झाला. त्यामुळे यापूर्वी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांतील जागा एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करता येणार नाही असा निर्णय न्यायालयाने २ मे रोजी दिला. त्यात संबंधित स्पष्टीकरण द्यावे असे सेलचे म्हणणे होते. एसईबीसी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे आरक्षणाविरुद्धच्या याचिकांवरील निर्णयाधीन राहतील असे न्यायालयाने सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. तसेच, अंतिम निर्णयातही सर्व आवश्यक मुद्दे नमूद केले. असे असताना संबंधित स्पष्टकरण मागितल्यामुळे सेलला न्यायालयाचा दणका सहन करावा लागला.एमडीएस, एमडी, एमएस व डिप्लोमा इन मेडिकल सायन्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील १६ टक्के जागा एसईबीसी उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे डॉ. संजना वाडेवाले व इतर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या होत्या. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला १६ ऑक्टोबर व २ नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात झाली. एसईबीसी कायदा ३० नोव्हेंबर २०१८ पासून लागू झाला. त्यामुळे हा कायदा या अभ्यासक्रमांतील प्रवेशाला लागू केला जाऊ शकत नाही. कायद्यातील कलम १६ (२) मधील तरतुदीनुसार हा कायदा पूर्वलक्षीप्रभावाने लागू करता येत नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने या याचिका मंजूर केल्या आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षण