शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

‘त्या’ जमिनी परत करण्याबाबत महिनाभरात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘वेकोलि’ने नागपूर जिल्ह्यात संपादित केलेल्या काही जमिनींवर अद्यापपर्यंत कोळसा खाण सुरू होऊ शकलेली नाही. अशा ठिकाणी कोळसा खाण कितपत फायदेशीर ठरेल यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘वेकोलि’चे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीवरंजन मिश्रा यांनी ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतली ‘वेकोलि’ची आढावा बैठक : काम सुरू न झालेल्या खाणींच्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘वेकोलि’ने नागपूर जिल्ह्यात संपादित केलेल्या काही जमिनींवर अद्यापपर्यंत कोळसा खाण सुरू होऊ शकलेली नाही. अशा ठिकाणी कोळसा खाण कितपत फायदेशीर ठरेल यासंदर्भात अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर संपादित जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘वेकोलि’चे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीवरंजन मिश्रा यांनी दिली. ‘वेकोलि’च्या मुख्यालयात मंगळवारी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीला माजी आमदार आशिष जयस्वाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्यासह ‘वेकोलि’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सावनेर परिसरातील काही शेतकऱ्यांची जमीन कोळसा खाणीसाठ़ी संपादित केली. गेल्या ३-४ वर्षांपासून ही जमीन ‘वेकोलि’च्या ताब्यात आहे. पण खाण सुरु झाली नाही म्हणून या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही व जमीनही परत मिळाली नाही. बोरगाव, सोनपूर, आदासा या भागातील शेतकऱ्यांची जमीनही संपादित करण्यात आली आहे याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर राजीवरंजन मिश्रा यांनी सांगितले की, या जमिनी परत करण्याच्या दृष्टीने महिनाभरात कारवाई करण्यात येईल. महानिर्मितीला लागणारा कोळसा ‘वेकोलि’कडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. महानिर्मितीला कोळसा कमी पडणार नाही, अशी हमी मिश्रा यांनी दिली. ज्या ठिकाणी रेल्वेने कोळसा नेणे शक्य नाही त्या ठिकाणी रस्ते वाहतुकीतून कोळसा पुरवठा झाला पाहिजे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया त्वरित करण्याचे निर्देशही चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीला दिले. उमरेडजवळ हेवती येथील वीज प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सन २०१४-१५ च्या धोरणानुसार करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले‘वेकोलि’चे सांडपाणी सिंचनासाठी मिळणार‘वेकोलि’चे सांडपाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठ़ी देण्यासाठी येत्या २८ एप्रिलला विदर्भ सिंचन महामंडळ आणि ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्यांमध्ये सामंजस्य करार करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात येणार आहे.पिण्याचे पाणी बंद करु नकापिपळा, वलनी, सिलेवाडा या कोळसा खाणीजवळ राहणाऱ्या नागरिकांना ‘वेकोलि’तर्फे मिळणारे पाणी बंद करण्यात आले. शेतकऱ्यांना यापूर्वी शेतीसाठ़ी पाणी मिळत होते. तेही बंद करण्यात आले. यावर पिण्याचे पाणी बंद न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी ‘वेकोलि’ला दिले. शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय तीन दिवसात अभ्यास करून घेतला जाईल, अशी माहिती ‘वेकोलि’तर्फे या बैठकीत देण्यात आली.

टॅग्स :Western Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरFarmerशेतकरी