शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा निर्णय : अतिक्रमण कुठेही करा, अपात्रतेची कारवाई होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:35 IST

एका गावातील ग्राम पंचायत सदस्याने दुसऱ्या गावात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले तरी अपात्रतेची तरतूद लागू होते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. या निर्णयामुळे वाशीम जिल्ह्यातील एका अपात्र सरपंचाला दणका बसला.

ठळक मुद्देवाशीम जिल्ह्यातील सरपंचाला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका गावातील ग्राम पंचायत सदस्याने दुसऱ्या गावात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले तरी अपात्रतेची तरतूद लागू होते असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. या निर्णयामुळे वाशीम जिल्ह्यातील एका अपात्र सरपंचाला दणका बसला.भागवत गवळी असे अपात्र सरपंचाचे नाव असून ते मोरगव्हाण, ता. रिसोड येथील सरपंच होते. सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण भोकारखेडा गावात आहे. आपण मोरगव्हाण गावात राहतो व या गावाच्या ग्राम पंचायत सदस्यपदी निवडून आलो आहोत. त्यामुळे भोकारखेडा गावातील अतिक्रमणामुळे आपल्याला अपात्र ठरवले जाऊ शकत नाही असा दावा गवळी यांनी केला होता. उच्च न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. कायद्यामध्ये अशाप्रकारची तरतूद नाही. तसेच, सध्याच्या तरतुदीला अशाप्रकारे मर्यादित केले जाऊ शकत नाही असे न्यायालयाने सांगितले. गवळी यांना अपात्र ठरविण्यासाठी आनंदा कांबळे यांनी तक्रार केली होती. त्यावरून १६ डिसेंबर २०१७ रोजी वाशीम जिल्हाधिकाºयांनी ग्राम पंचायत कायद्यानुसार गवळी यांना अपात्र ठरवले. त्याविरुद्ध गवळी यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेले अपीलही खारीज झाले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEnchroachmentअतिक्रमण