लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला.नीलेश दिलीप पोटफाटे (२७) असे आरोपीचे नाव असून, तो वरुड, जि. अमरावती येथील रहिवासी आहे. फिर्यादीचे नाव दालचंद हेमराज गजभिये (४२) असे आहे. ते नरखेड येथील रहिवासी आहेत. ही घटना १८ आॅक्टोबर रोजी घडली होती. गजभिये धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त दीक्षाभूमी येथे जाण्यासाठी नागपूरला आले होते. ते दुपारी १२.३० च्या सुमारास मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरून दीक्षाभूमीकडे जात असताना गणेश टेकडी मंदिरापुढे आरोपीने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ सुरू केली तसेच त्यांच्या खिशातील २०० रुपये रोख व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर गजभिये यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली तसेच प्रकरणाचा झटपट तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयानेही तातडीने सुनावणी पूर्ण करून निकाल दिला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. राजेश श्यामसुंदर व अॅड. साधना बोरकर यांनी काम पाहिले.
केवळ सात दिवसांत दिला खटल्यावर निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:58 IST
सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला.
केवळ सात दिवसांत दिला खटल्यावर निर्णय
ठळक मुद्देसत्र न्यायालय : आरोपीला दोन वर्षाचा कारावास