शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मेयो इस्पितळात डीन, सुपरमध्ये ओएसडी नियुक्तीवर दोन आठवड्यांत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 22:26 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे नियमित अधिष्ठाता (डीन) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी (ओएसडी) यांची नियुक्ती दोन आठवड्यांत केली जाईल अशी ग्वाही राज्य शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

ठळक मुद्देशासनाची हायकोर्टात ग्वाही : उपकरणे खरेदीची निविदा लवकरच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे नियमित अधिष्ठाता (डीन) आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी (ओएसडी) यांची नियुक्ती दोन आठवड्यांत केली जाईल अशी ग्वाही राज्य शासनाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १८ अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची खरेदी करण्यासाठी गेल्या आॅक्टोबरमध्ये जिल्हा नियोजन समिती निधीतून ३ कोटी २५ लाख ९७ हजार ४८३ रुपये मंजूर झाले आहेत. परंतु, अद्याप उपकरणांची खरेदी करण्यात आली नाही. यासंदर्भात दोन आठवड्यांत निविदा नोटीस प्रकाशित केली जाईल असे शासनाने सांगितले. तसेच, मेयोतील नवीन शस्त्रक्रिया विभागांत एसी बसविण्याची व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा शासनाला आदेश देऊन प्रकरणावर २५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.शासकीय रुग्णालयांच्या विकासाविषयी २००० सालापासून न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. दरम्यान, आतापर्यंत विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील अनेक प्रश्न न्यायालयासमक्ष मांडण्यात आलेत. न्यायालयाच्या आदेशांमुळे त्यापैकी बरेच प्रश्न सुटले आहेत. या प्रकरणात अ‍ॅड. अनुप गिल्डा न्यायालय मित्र आहेत. शासनातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर