शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

केएफडब्ल्यूचे मेट्रो प्रकल्पाला ५०० दशलक्ष युरोचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:25 IST

भारताच्या फ्लॅगशीप कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’मध्ये जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत जर्मनीच्या डेप्युटी चीफ आॅफ मिशनचे डॉ. जस्पर विक यांनी व्यक्त केले. विक हे भारतातील जर्मनीच्या दूतावासाचे आर्थिक व ग्लोबल अफेयरचे प्रमुख आहेत.

ठळक मुद्देडॉ. जास्पर वीकने केली मेट्रो प्रकल्पाची आकस्मिक पाहणी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताच्या फ्लॅगशीप कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’मध्ये जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत जर्मनीच्या डेप्युटी चीफ आॅफ मिशनचे डॉ. जस्पर विक यांनी व्यक्त केले. विक हे भारतातील जर्मनीच्या दूतावासाचे आर्थिक व ग्लोबल अफेयरचे प्रमुख आहेत.डॉ. विक यांनी जर्मनीच्या केएफडब्ल्यूच्या शिष्टमंडळासोबत महामेट्रोच्यानागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि वेगाने विकास होणाऱ्या नागपूर मेट्रोच्या प्रकल्पाची प्रशंसा केली. महामेट्रो प्रकल्प इंडो-जर्मन आर्थिक सहयोगाचा दीपस्तंभ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी राजकीय विभागाच्या मरियन स्ट्रोबेल आणि केएफडब्ल्यूचे उपसंचालक अनिरबन कुनडू उपस्थित होते.पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. विक म्हणाले, नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य अतिशय योग्य पद्धतीने पूर्ण होत असून यात प्रामुख्याने सौर ऊर्जेचा वापर होत असल्याने ते पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. तसेच प्रकल्पांतर्गत प्रस्तावित फिडर सर्व्हिसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल. प्रकल्पातील वैशिष्ट्यांमुळे महामेट्रोची सेवा नागपूरकरांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.विक म्हणाले, जर्मनी कोचीमध्ये निर्मित वॉटर ट्रान्सपोर्ट आणि मेट्रोच्या कामासह राज्यात सोलर प्रकल्पातही गुंतवणूक करीत आहे. गंगा स्वच्छतेच्या प्रकल्पात काम करीत आहे. जर्मनी भारताला दरवर्षी एक अब्ज युरोचे कर्ज देत आहे. त्यांनी भारतातील संशोधन आणि विकास कामांची प्रशंसा केली.केएफडब्ल्यूच्या शिष्टमंडळाने सर्वप्रथम मेट्रो अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाविषयी चर्चा केली. एक तास चाललेल्या बैठकीत जर्मनीच्या अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यात मेट्रो प्रकल्पाचा विस्तार, प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि आगामी काळातील नियोजनाची माहिती देण्यात आली. यानंतर जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी मेट्रो राईडचा आनंद अनुभवला. एअरपोर्ट साऊथ ते खापरी आणि परतीचा प्रवास त्यांनी मेट्रोतून केला. खापरी मेट्रो स्टेशन आणि तेथील सोईसुविधांची पाहणी जर्मनीच्या शिष्टमंडळाने केली.जर्मनीची केएफडब्ल्यू वित्त कंपनी महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाला ५०० दशलक्ष युरोचे कर्ज देत आहे. कंपनीने आतापर्यंत सुमारे २० टक्के कर्ज महामेट्रोला दिले आहे.दौऱ्यात महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अ‍ॅण्ड सिस्टीम) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक (एसपी) एस रामनाथ, कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक अ‍ॅण्ड सिस्टीम) जनककुमार गर्ग, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर