ठळक मुद्देकळमना भागात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च विजेच्या वाहिनीचा (हायटेन्शन लाईन) जोरदार करंट लागल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला तर त्याची पाचवर्षीय भाची जबर जखमी झाली. अभिमन्यू यादव (वय २५), असे मृताचे आणि मयूरी जितेंद्र निर्मलकर असे जखमी बालिकेचे नाव आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगरात गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.