शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

तृतीयपंथी चमचमचा मृत्यू : प्रचंड तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:29 PM

तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याने गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय परिसर आणि तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, कळमना पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याचे कलम ३०२ नोंदविले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी बंदोबस्त वाढवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तृतीयपंथीयांचे नेतृत्व करण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याने गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय परिसर आणि तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, कळमना पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याचे कलम ३०२ नोंदविले आहे.कळमन्यातील कामनानगरात मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास तृतीयपंथीयांचा गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी उत्तमबाबाने आपल्या साथीदारांसह चमचम गजभियेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. तेव्हापासून चमचम अत्यवस्थ अवस्थेत होती. तृतीयपंथीयांच्या गटाची गादी (गुरू पद) आणि रोजच्या कमाईतील हिस्सा मिळावा यासाठी सध्याचा गुरू उत्तमबाबा याला चमचमने विरोध चालविला होता. त्याने आपला गट निर्माण केला, तो रोजची हजारोंची कमाई लपवून योग्य तेवढा हिस्सा प्रामाणिकपणे देत नसल्याचे लक्षात आल्याने उत्तमबाबा त्याच्यावर चिडून होता. गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या हिस्सेवाटणीमुळे ही धुसफूस तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी दुपारी १.३० वाजता रोजची फेरी आटोपून प्रवीण ऊर्फ चमचम प्रकाश गजभिये आणि तिचे साथीदार घरी परतले होते. चमचमच्या कामनानगरातील घरी ते पैशाची हिस्सेवाटणी करून पांगले असतानाच उत्तमबाबा, चट्टू ऊर्फ कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि साथीदार चमचमच्या घरी पोहचले. त्यांनी चमचमवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात चमचम गंभीर जखमी झाली. चमचमला तिच्या सहकाऱ्यांनी कामठी मार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल केले.औषधोपचारावर हजारोंचा खर्च करूनही चमचमच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे शहरातील तृतीयपंथीयांनी तिला दुसऱ्या एका रुग्णालयात हलविले होते. तेथील डॉक्टरांनी सोमवारी रात्री चमचमला मृत घोषित केले. हे वृत्त कळताच मोठ्या संख्येत तृतीयपंथीयांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे रुग्णालयासमोर प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलिसांचा मोठा ताफा तेथे पोहचला. चमचमच्या मृत्यूमुळे कळमन्यासह तृतीयपंथीयांचे वास्तव्य असलेल्या अनेक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री कळमना पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्याचे कलम ३०२ नोंदविले आहे. घटनेच्या काही तासानंतरच पोलिसांनी मुख्य आरोपी उत्तम बाबा, कलम उईके, किरण गौरी, निसार शेख आणि लखन पारशिवनीकर यांना अटक करण्यात आली होती.वाद चिघळणार!उत्तम आणि किरण हे पोलीस कोठडीत असून, अन्य तिघांना न्यायालयीन कस्टडीत पाठविण्यात आले आहे. उत्तम आणि किरणची कोठडी मंगळवारी संपणार असतानाच सोमवारी रात्री चमचमचा मृत्यू झाल्याने पोलिसही हादरले आहेत. कारण कोठडीत असलेल्या उत्तमचा गेम करण्यासाठी त्याच्या विरोधातील तर उत्तमला त्रास होऊ नये म्हणून त्याचे साथीदार वारंवार पोलीस ठाण्याच्या परिसरात घुटमळत राहतात. चमचमच्या मृत्यूमुळे त्यांच्यातील वाद चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.

टॅग्स :MurderखूनTransgenderट्रान्सजेंडर