आॅनलाईन लोकमतनागपूर : भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.या परिसरात बोर व्याघ्र प्रकल्प असून, कळमेश्वर तालुक्यातील जंगली भाग लागूनच आहे. त्यामुळे या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान, ही वाघीण सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील घुलीवाला पूल ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आलोकर आणि कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तिचे वय पाच ते सहा वर्षे असल्याची माहिती आलोकर यांनी दिली. याच वाघिणीने आठवडाभरापूर्वी पाचनवरी शिवारात एका गाईची शिकार केली होती. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून या घुलीवाला पुलावर वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील वर्षी याच पुलावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा व त्यापूर्वी हरणाचा मृत्यू झाला होता. या बाबी वन विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाही.
नागपूरनजीक अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 20:40 IST
भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.
नागपूरनजीक अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू
ठळक मुद्देबाजारगाव शिवारातील घटना : रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक