शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रांसोबत शाळेच्या छतावर खेळत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा इमारतीजवळून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा (तांडा) येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. तक्रार करूनही तारा हटविण्यात न आल्याने ही घटना घडल्याचा आरोप करीत ...

ठळक मुद्देदाभा येथील घटना : मृतदेह उचलण्यास नागरिकांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रांसोबत शाळेच्या छतावर खेळत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा इमारतीजवळून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा (तांडा) येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. तक्रार करूनही तारा हटविण्यात न आल्याने ही घटना घडल्याचा आरोप करीत कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलिसांना मृतदेह उचलण्यास विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी नागरिकांची समजूत काढत शांत करण्याचा प्रयत्न केला.आदित्य वासुदेव राठोड (११, रा. तांडा-दाभा, ता. हिंगणा) असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य हा दाभा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. या शाळेच्या इमारतीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या उघड्या आहेत. आदित्य शाळा सुटल्यानंतर त्याच्या दोन मित्रांसोबत या शाळेच्या छतावर खेळत होता. खेळताना त्याचा तोल गेला आणि जवळच असलेल्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्श झाला. विद्युत धक्क्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्यातच त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ गोळा झाले. सदर घटनेची माहिती लगेच हिंगणा पोलीस व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करताच नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनीने विजेच्या तारा न हटविल्याने ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांसह नागरिकांनी केला. शिवाय, आदित्यच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणीही रेटून धरल्याने घटनास्थळी तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते.मात्र, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रात्री उशिरापर्यंत पेच कायम होता.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज