शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डीआयजींच्या बंगल्यावरील पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गडचिरोलीचे डीआयजी अंकुश शिंदे यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गडचिरोलीतील नायक पोलीस ...

ठळक मुद्देगडचिरोलीचे कर्मचारी : मुदत संपूनही ठेवले होते नागपुरात कर्तव्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोलीचे डीआयजी अंकुश शिंदे यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गडचिरोलीतील नायक पोलीस शिपायाचा अकस्मात मृत्यू झाला. संतोष पेंड्डीवार (वय ४३) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.पेंड्डीवार हे गडचिरोली पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांची गेल्या महिन्यात गडचिरोलीचे डीआयजी अंकुश शिंदे यांच्या नागपुरातील बंगल्यावर एक महिन्यासाठी गार्ड ड्युटी लागली होती. शिंदे यांचा बंगला नवीन आरबीआयजवळ आहे. पेंड्डीवार यांच्या नियुक्तीचा महिनाभराचा कालावधी पूर्ण झाला होता. ते गडचिरोलीला परत जाण्याच्या प्रतीक्षेत होते; मात्र त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. रविवारी सायंकाळी त्यांनी त्यांच्यासोबतच्या पोलिसाला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना झोपण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पेंड्डीवार झोपायला गेले. रात्री १० च्या सुमारास सहकारी पेंड्डीवार यांना जेवण करण्यासाठी आवाज देऊ लागला. प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याने जवळ जाऊन बघितले तेव्हा पेंड्डीवार बेशुद्धावस्थेत आढळले. ही माहिती लगेच वरिष्ठांना कळविण्यात आली. पेंड्डीवार यांना मेयोत नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास डॉक्टरांनी पेंड्डीवार यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.कुटुंबीयांना धक्कापेंड्डीवार यांच्या कुटुंबात आई-वडील, पाच बहिणी, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असल्याचे समजते. दोन-तीन दिवसांपासून प्रकृती चांगली नसल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळविले होते. कधी एकदा सुटी होऊन कुटुंबीयांमध्ये जातो, असे त्यांना वाटत होते. मात्र, त्यांचा मृतदेहच त्यांच्या घरी नेण्यात आला. त्यामुळे पेंड्डीवार कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू