शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

नागपुरात ओला कॅब चालकाचा कारमध्येच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:46 IST

कॅब चालकाचा त्याच्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शिवाजीनगरात आज सकाळी खळबळ उडाली. योगेश वसंतराव आपटे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. अत्याधिक दारूच्या सेवनामुळे कारमध्येच पडून राहिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासातून पुढे आला आहे.

ठळक मुद्देशिवाजीनगरात खळबळ : अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅब चालकाचा त्याच्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शिवाजीनगरात आज सकाळी खळबळ उडाली. योगेश वसंतराव आपटे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. अत्याधिक दारूच्या सेवनामुळे कारमध्येच पडून राहिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासातून पुढे आला आहे.शिवशक्तीनगर(म्हाळगीनगर)मध्ये राहणारे आपटे वर्षभरापासून ओला कॅबसाठी चालक म्हणून काम करीत होते. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर सिमेंट रोडवर दोन दिवसांपासून स्वीफ्ट कार (एमएच ४९/एफ १२७७) बेवारस अवस्थेत उभी होती. बाजूच्यांनी उत्सुकतेपोटी कारच्या काचेतून आत डोकावले. त्यात वाहनचालकाच्या सीटवर एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसला. तो कोणतीही हालचाल करीत नसल्याने एकाने अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी लगेच तेथे धाव घेतली. कारच्या आतमध्ये आपटे मृतावस्थेत पडून होते. त्यांच्या खिशातून काढलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांना त्यांचा नाव पत्ता कळला. पोलिसांनी आपटेंच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करण्यात आला. प्राथमिक तपासात आपटेंना दारूचे व्यसन होते. त्यामुळे दारूच्या नशेत ते कुठेही राहायचे. दोन-तीन दिवस ते घरी येत नव्हते. दोन दिवसांपूर्वी ते घराबाहेर पडले होते. घरच्यांनी त्यांना शुक्रवारी फोन केला. त्यांचा मोबाईल वाजत होता, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. आपटेंचा मृत्यू दारूच्या अत्याधिक सेवनामुळे किंवा दारूच्या नशेत त्यांना झोपलेल्या अवस्थेत हृदयविकाराचा झटका येऊन झाला असावा, असा अंदाज ठाणेदार महेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तविला. दरम्यान, अभय बबनराव घोरे (वय ३९, रा. नवीन शुक्रवारी, राम कूलरजवळ, कोतवाली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूOlaओलाcarकार