शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात इस्पितळाच्या हलगर्जीपणामुळे नवमातेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:16 IST

बाळंतपणानंतर सातत्याने दोन महिने दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर बाळाच्या आईचा मृत्यू झाला अन् संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

ठळक मुद्देपतीने केली पोलिसांत तक्रार ‘आयएमए’ने कारवाई करण्याची मागणी

मेघा तिवारी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नानंतर पाच वर्षांनी संसारवेलीवर अपत्यरूपी फूल उमलल्याने ते आनंदी होते. मात्र चिमुकल्याला जवळ घेऊन त्याचे लाड करण्याची संधीदेखील त्याच्या मातेला मिळाली नाही. बाळंतपणानंतर सातत्याने दोन महिने दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर बाळाच्या आईचा मृत्यू झाला अन् संसाराच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आपल्या बाळावर एकाप्रकारे अन्यायच झाला असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच पत्नी निकिता हिचा मृत्यू झाला आहे, असा आरोप अमित तिडके यांनी लावला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे.२८ आॅगस्ट रोजी निकिता तिडके यांना प्रसूतीसाठी गांधीबाग येथील अरिहंत इस्पितळात दाखल करण्यात आले. यावेळी डॉ.विनय रोडे यांनी ‘सिझर’ करून प्रसूती केली. मात्र हे करण्याअगोदर रक्ताची तपासणी किंवा शस्त्रक्रियेअगोदरच्या चाचण्या करण्यात आल्या नाही. त्यानंतर निकिता यांची प्रकृती ढासळत गेली. २८ आॅगस्ट रोजीच्या चाचण्यांमध्ये ‘टीएलसी’चे (टोटल ल्युकोसाईट काऊंट) व ‘एससी’चे (सिरम क्रिएटीन) प्रमाण सामान्य होते. त्यानंतर दोनच दिवसात त्यांचे संतुलन बिघडल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यानंतर ‘किडनी’ व ‘लिव्हर’ची समस्या निर्माण झाली. यासंदर्भात डॉ.रोडे यांनी आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही. तुमच्या पत्नीला दोन दिवसांत सुटी होईल, असेच ते सांगत होते. ३० आॅगस्ट रोजी निकिता यांची प्रकृती आणखी खराब झाली. प्रसूती शस्त्रक्रियेनंतर लावलेल्या टाक्यांमुळे संसर्ग झाला होता. अरिहंत इस्पितळात ‘आयसीयू’ नसल्याने त्यांना दुसऱ्या इस्पितळात उपचारांसाठी नेण्याचा अमित यांनी निर्णय घेतला. यावेळी डॉ.रोडे यांनी तपासण्याचीदेखील तसदी घेतली नाही. दुसºया इस्पितळात लगेच सर्व चाचण्या करण्यात आल्या. यावेळी निकिता यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्याचे दिसून आले. तसेच ‘किडनी’ व ‘लिव्हर’वरदेखील सूज आली होती. त्यानंतर १० आॅक्टोबर रोजीदेखील एक शस्त्रक्रिया झाली. मात्र अखेर निकिता यांचा २४ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला.डॉ.विनय रोडे यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केले होते. तसेच चाचण्या न करताच शस्त्रक्रिया केली. टाकेदेखील चुकीच्या पद्धतीने घातले. यामुळेच निकिताला विविध संसर्ग झाले. आम्हाला कुठलेही पैसे किंवा नुकसानभरपाई नको. मात्र भविष्यात असे कुणासोबत होऊ नये अशी भावना अमित तिडके यांनी व्यक्त केली. तिडके यांनी डॉ.विनय रोडे यांच्याविरोधात तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच ‘आयएमए’, जिल्हाधिकारी यांच्याकडेदेखील तक्रार केली आहे.

अहवालानंतर कारवाईचा निर्णय : ‘आयएमए’यासंदर्भात ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ.आशिष दिसावल यांना विचारणा केली असता आम्हाला तक्रार प्राप्त झाल्याचे त्यांनी मान्य केले. आम्ही ही तक्रार रुग्ण तक्रार समितीकडे पाठविली आहे. संपूर्ण चौकशी करून आठवड्याभरात ही समिती अहवाल सादर करेल. या अहवालानंतरच कारवाईबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

कुटुंबाला सर्व माहिती दिली : डॉ. रोडेडॉ.विनय रोडे यांनी सर्व आरोपांचे खंडन केले आहे. ‘अरिहंत’मध्ये असताना रुग्णाची तब्येत चांगली होती. मात्र आमच्याकडून पैसे उकळण्यासाठी असे आरोप लावण्यात येत आहेत. कुटुंबाला सर्व माहिती दिली होती व त्यानंतरच सर्व निर्णय घेतले होते, असा दावा डॉ.रोडे यांनी केला.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू