शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

By admin | Updated: January 5, 2017 02:28 IST

कळमन्यातील चिखली कम्पाऊंड वॉलसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून एका मजुराचा मृत्यू झाला,

नासुप्र कॉम्प्लेक्सचे बांंधकाम : कळमना चिखली येथील घटना नागपूर : कळमन्यातील चिखली कम्पाऊंड वॉलसाठी खड्डा खोदताना विजेचा धक्का लागून एका मजुराचा मृत्यू झाला, तर त्याच्या भावासह तिघे जखमी झाले. ही घटना लपविण्यासाठी बांधकाम कंपनीने उशिरापर्यंत पोलिसांनाही याची माहिती दिली नाही. मीडियातील चर्चेनंतर पोलिसांना स्वत: पुढाकार घ्यावा लागला. परमेश यादन्ना देवराई (२७) असे मृताचे नाव आहे. तर त्याचा भाऊ व्यंकटेश देवराई (३२), राजू देवराई (२३) रा. साईनगर दिघोरी आणि सेवकदास झोडापे (४०) रा. राधानगर नरसाळा अशी जखमीची नवे आहेत. चिखली येथे नागपूर सुधार प्रन्यासच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे. जे. बी. कन्स्ट्रक्शन कंपनीला बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे. या ठिकाणी आठवडाभरापासून कम्पाऊंड वॉलचे काम सुरू आहे. दुपारी ४.३० वाजता येथे मजूर हॅन्ड पाईल(खड्डा खोदण्याचे उपकरण)ने खड्डा करीत होते. ज्या जागेवर खड्डा केला जात होता तिथे भूमिगत विजेचे केबल होते. मजुरांना याची कल्पना नव्हती. चौघेही हॅन्ड पाईलला पकडून खड्डा करीत होते. हॅन्ड पाईलमुळे विजेचे केबल कटल्याने विजेचा धक्का लागल्याची शंका वर्तविली जात आहे. परमेशचा भाऊ व्यंकटेश आणि त्याचा साथीदार सेवकदास एका झटक्यातच दूर फेकल्या गेले, तर परमेश आणि राजू हॅन्ड पाईलला चिकटले. आरडाओरड ऐकून इतर मजूर घटनास्थळी धावले. त्यांनी फावड्याच्या मदतीने राजूला हॅन्ड पाईलपासून वेगळे केले. परमेशलाही दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तोपर्यंत परमेशने जीव सोडला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मजुरांच्या मते, सुपरवायझर शीतलप्रसाद पांडेय यांनी जे.बी. कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक पुरुषोत्तम रोहेरा यांना घटनेची माहिती दिली. यानंतर मजुरांना कमाल चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून मेयो रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी परमेशला तपासून मृत घोषित केले. मजुरांनुसार ही घटना लपविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. पोलीस नियंत्रण कक्ष आणि कळमना पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली नाही. पत्रकारांनी संपर्क साधला तेव्हा काही वेळासाठी कळमना पोलिसही हादरले. मेयो रुग्णालयातून घटनेची माहिती मिळाली. तेव्हा कळमना पोलिसांनी हालचाल केली. घटनास्थळाजवळच खासगी रुग्णालय आहे. तसेच मजुरांना थेट मेयो रुग्णालयातही नेण्यात येऊ शकले असते. असे असताना कमाल चौकातील खासगी रुग्णालयात नेण्याचे कारण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.(प्रतिनिधी) चप्पल ठरले मृत्यूचे कारण मजुरांच्या माहितीनुसार काम करीत असताना सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. कंपनीचा सुपरवायझर खानापूर्ती म्हणूनच राहत होता. चप्पल घातली नसल्यानेच परमेशला जीव गमवावा लागला. चप्पल असल्याने त्याचे भाऊ आणि तीन मजुरांचा जीव वाचला. नासुप्र कॉम्प्लेक्सचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. सुरुवातीपासूनच येथे सुरक्षेचे कुठेलही पालन होत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. पुन्हा एका मजुराचा मृत्यू सेंट्रिंगचे काम करीत असताना पडून एका मजुराचा मृत्यू झाला. नित्यानंदा माखोम अधिकारी (४०) रा. कोलकाता असे मृत मजुराचे नाव आहे. मृत मजूर जगनाडे चौकातील नासुप्र बस टर्मिनलच्या नवनिर्मित इमारतीत काम करीत होता. मंगळवारी दुपारी १ वाजता सेंट्रिंगचे काम करीत असताना तो बोर्डवर उभा होता.