शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू : खुनाच्या गुन्ह्याची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:18 IST

पत्नीसोबत झालेल्या वादात तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सूरज खोब्रागडे याचा मृत्यू झाला आहे. सूरजच्या वडिलांनी मुलाच्या हत्येत साळ्यासह पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे.

ठळक मुद्देसाळ्याचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीसोबत झालेल्या वादात तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या सूरज खोब्रागडे याचा मृत्यू झाला आहे. सूरजच्या वडिलांनी मुलाच्या हत्येत साळ्यासह पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप केला आहे. यामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे.१२ मेच्या रात्री सूरजची हत्या करण्यात आली होती. सूरजचा पत्नी अश्विनीसोबत वाद झाला होता. अश्विनीने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घरी बोलविले होते. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. अश्विनीचा भाऊ अंकुश बन्सोडने एकट्यानेच सूरजवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. या आधारावर जरीपटका पोलिसांनी हत्येच्या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून अंकुशला अटक केली आहे. सूरजचा मेडिकलमध्ये उपचार सुरू होता. मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.सूरजचे वडील नरेंद्र खोब्रागडे यांनी हत्येत अंकुशचे कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप केला आहे. नरेंद्र खोब्रागडे चौकीदारी करतात. त्यांच्यानुसार १४ फेब्रुवारी २०१६ ला सूरजचा विवाह झाला होता. तेव्हापासूनच अश्विनी आणि तिचे कुटुंबीय सूरजला त्रास द्यायचे. त्याला एकदा मारहाण करण्यात आली होती. सूरजचा अश्विनीसोबत सामान्य दाम्पत्याप्रमाणेच वाद व्हायचा. पण अश्विनी आपल्या कुटुंबीयांना घरी बोलवून वाद वाढवायची. घटनेच्यावेळी अश्विनीने कुटुंबीयांना फोन करून घरी बोलविले होते. कुटुंबीयांनी सूरजला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते. त्यावेळी ड्युटीवर असल्यामुळे घरी पोहोचलो नाही.वादाच्या कारणाने त्यांनी सूरजची हत्या केली. हत्येत अश्विनी आणि तिच्या आई-वडिलांचा सहभाग आहे. त्यांच्या बचावासाठी अंकुशने गुन्हा एकट्यानेच केल्याचे सांगितले आहे. सूरजला १० महिन्यांचा आदर्श नावाचा मुलगा आहे. खोब्रागडे यांनी अन्य आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. सूरज एकुलता एक मुलगा होता. कुटुंबात पत्नीसह विवाहित मुलगी आहे. आतापर्यंत पोलिसांच्या चौकशीत हत्येच्या गुन्ह्यात अंकुश सहभागी असल्याचे दिसून आले आहे. जरीपटका पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून