शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जखमी हॉटेल व्यावसायिकाचा अखेर मृत्यू : जरीपटक्यात हत्येचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:50 IST

शुक्रवारी पहाटे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हॉटेल व्यावसायिक महेश वरयानी यांचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देचार दिवस मृत्यूशी झूंज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी पहाटे प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हॉटेल व्यावसायिक महेश वरयानी यांचा सोमवारी रुग्णालयात मृत्यू झाला.वरयानी हे त्यांचे हॉटेल बंद करून पत्नीसह घरी परत जात होते. त्यांच्या घराजवळ पॉवरग्रीड चौकात आरोपी आकाश छाबडा आणि त्याचा भाऊ दीपक या दोघांनी महेशचा पाठलाग केला. जवळ येऊन महेशची पत्नी भाविशा हिला लज्जास्पद भाषेत बोलले. त्यामुळे महेशने स्कुटर थांबवून आरोपींना जाब विचारला असता आरोपी छाबडा बंधूंनी महेश वरयानीवर प्राणघातक हल्ला चढवला. एकाने त्यांच्या डोक्यावर बियरची बॉटल फोडली तर दुस-याने चाकू काढून भोसकले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, पत्नी भाविशाच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. जखमी वरयानी यांनी चार दिवस मृत्यूशी झूंज दिल्यानंतर सोमवारी रात्री प्राण सोडले. त्यामुळे जरीपटका पोलिसांनी आता या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून