लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर वन विभागाच्या पश्चिम चांदा वन क्षेत्रात अपघातात गंभीर जखमी झालेल्या अस्वलाला नाका, तोंडातून रक्तस्राव झाल्याने हृदय व श्वासाची समस्या निर्माण झाली होती. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटर येथे आणले होते. परंतु मंगळवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान अस्वलाचा मृत्यू झाला.गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे विभागीय अधिकारी नंदकिशोर काळे, एसीएफ एच. व्ही. माडभूषी, डॉ. विनोद धूत, डॉ. सुजित कोलगंथ, डॉ. पी. एम. सोनकुसळे, डॉ. मयूर पावसे आदींच्या उपस्थितीत अस्वलावर अंतिम संस्कार करण्यात आले.सोमवारी ३१ डिसेंबरला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर येथे अमरावतीच्या वडाळी वनक्षेत्रात जखमी झालेल्या बिबट्याला उपचरासाठी आणले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून बिबट्यावर उपचार सुरू होते. तसेच रविवारी देवलापार येथून उपचारासाठी आणलेल्या मादी बिबट्याचाही मृत्यू झाला.
नागपुरातील गोरेवाडा येथे जखमी अस्वलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:33 IST
चंद्रपूर वन विभागाच्या पश्चिम चांदा वन क्षेत्रात अपघातात गंभीर जखमी झालेल्या अस्वलाला नाका, तोंडातून रक्तस्राव झाल्याने हृदय व श्वासाची समस्या निर्माण झाली होती. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटर येथे आणले होते. परंतु मंगळवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान अस्वलाचा मृत्यू झाला.
नागपुरातील गोरेवाडा येथे जखमी अस्वलाचा मृत्यू
ठळक मुद्देचांदा क्षेत्रात झाला होता अपघातात