शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

संसार थाटण्यापूर्वीच झाला तिचा मृत्यू : नागपूर रेल्वे स्थानकावरील दुर्दैवी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:18 IST

एकमेकांवर जिवापाड प्रेम. लग्नाला विरोध होईल म्हणून त्यांनी घरून पळ काढला. हैदराबादला जाऊन लग्न करायचे ठरविले. मात्र, संसार थाटण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एका १९ वर्षीय तरुणीचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ३१ मे रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या डी कॅबिनजवळ सकाळी उघडकीस आली. मृत तरुणीची ओळख न पटल्याने लोहमार्ग पोलिसांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.

ठळक मुद्देलग्न करण्यासाठी आले होते नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकमेकांवर जिवापाड प्रेम. लग्नाला विरोध होईल म्हणून त्यांनी घरून पळ काढला. हैदराबादला जाऊन लग्न करायचे ठरविले. मात्र, संसार थाटण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एका १९ वर्षीय तरुणीचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना ३१ मे रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या डी कॅबिनजवळ सकाळी उघडकीस आली. मृत तरुणीची ओळख न पटल्याने लोहमार्ग पोलिसांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.पौर्णिमा (१९) रा. छिंदवाडा (काल्पनिक नाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती ११ व्या वर्गात शिकत होती. तिला आई-वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वडील शेतकरी आहेत. तर श्रवण हा तिचा मित्र (२१) त्याच परिसरात राहतो. त्याचे वडीलही शेतकरी आहेत. मागील चार वर्षांपासून त्यांचे प्रेम आहे. लग्नाला विरोध होईल म्हणून दोघेही ३० मे रोजी घरून निघाले. नागपूर रेल्वेस्थानकावर सायंकाळी पोहोचले. हैदराबादला जाऊन लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी गाडी असल्याने दोघेही प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आराम करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास पिवळा टी शर्ट घातलेले दोघे त्यांच्याजवळ आले. मुलीला पाहून त्यांनी श्रवणला मारहाण करण्यास सुरुवात केली. भीतीपोटी पौर्णिमा आणि श्रवण जीव मुठीत घेऊन पळाले आणि त्यांची ताटातूट झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मेच्या सकाळी नागपूर रेल्वेस्थानक परिसरातील डी कॅबिनजवळ एक तरुणी मालगाडीने कटलेल्या स्थितीत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला मेयो रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. उपचारादरम्यान दुपारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास सहायक उपनिरीक्षक विजय मरापे करीत आहेत. मृत पौर्णिमाची ओळख न पटल्याने तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रवण छिंदवाडा पोलिसांच्या ताब्यातदरम्यान, पौर्णिमा दिसत नसल्यामुळे कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार नोंदविली. छिंदवाडा पोलीस तपास करीत असताना श्रवणला संशयाच्या आधारावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करून पौर्णिमाविषयी माहिती घेतली. लग्न करण्यासाठी घरून पळाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. श्रवणला घेऊन पोलीस नागपूर लोहमार्ग ठाण्यात पोहोचले. यावेळी पौर्णिमाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळले.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरDeathमृत्यू