शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर नजीकच्या देवलापार भागात बालकाचा डोहात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:34 IST

कुटुंबासह सहलीसाठी आलेल्यांपैकी पुरुष फिरायला गेली. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. यातील काही पुरुष पोहायला डोहात उतरताच पाच वर्षीय बालकानेही डोहाच्या काठावर पाण्यात खेळायला सुरुवात केली. अनावधानाने तो खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला.

ठळक मुद्देगोंडीटोलातील घटनाखेळण्यासाठी उतरला होता डोहात

आॅनलाईन लोकमतरामटेक : कुटुंबासह सहलीसाठी आलेल्यांपैकी पुरुष फिरायला गेली. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. यातील काही पुरुष पोहायला डोहात उतरताच पाच वर्षीय बालकानेही डोहाच्या काठावर पाण्यात खेळायला सुरुवात केली. अनावधानाने तो खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या  गोंडीटोला शिवारात असलेल्या बावनथडी नदीतील डोहात रविवारी दुपारच्या सुमारास घडली.समृद्ध शैलेंद्र सप्रे (५) असे या दुदैवी बालकाचे नाव आहे. रविवारी सुटी असल्याने शैलेंद्र सप्रे, रा. नरेंद्रनगर, नागपूर हे त्यांच्या काही मित्रांसोबत कुटुंबासह गोंडीटोला परिसरातील शीतलामाता गडावर पिकनिक तथा देवदर्शनासाठी आले होते. महिला मंडळींनी मंदिराच्या परिसरात स्वयंपाकाला सुरुवात करताच पुरुष मंडळी फिरायला निघाली. त्यात समृद्धही त्याच्या वडिलांसोबत फिरायला गेला होता. त्यांना बावनथडी नदीच्या पात्रात डोह दिसताच ते पाण्यात पोहायला उतरले. समृद्ध हा काही वेळ काठावर बसला आणि नंतर तोही पाण्यात खेळण्यासाठी उतरला.मात्र, अनावधानाने तो काही वेळातच खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्यावेळी त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. तो काठावर नसल्याचे लक्षात येताच वडिलांसह इतरांनी त्याचा शोध घेतला असता, तो पाण्यात बुडाल्याचे आढळून आले. त्यांनी समृद्धला शोधून पाण्याबाहेर काढले आणि लगेच रामटेक येथील डॉक्टरांकडे आणले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू घटनास्थळीच झाला असावा, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपासासाठी सदर प्रकरण देलापार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू