शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 22:11 IST

बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली होती.

कामठी - शिवजयंतीची सुटी असल्याने कामठीच्या महादेव घाट येथे कन्हान नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कामठीच्या हरदासनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजेश नितनवरे (१३) आणि प्रवेश प्रवीण नागदेवे (१४) रा. हरदासनगर, कामठी अशी मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली. यातील दोघे बुडताना दिसताना अन्य दोघांनी बाहेर येत त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरड केली. जलमित्र पुरुषोत्तम कावळे त्यांच्या सहकाºयांसह याच परिसरात होते. त्यांना दोन मुले बुडाल्याची माहिती मिळताच त्यांनी नदीपात्रात अजेश आणि प्रवेशचा शोध घेतला. दीड तासाच्या शोधमोहिमेनंतर या दोघांचे मृतदेह त्यांनी नदीपात्रातून बाहेर काढले. दोन दिवसापूर्वी अजेश नितनवरे याचा वाढदिवस होता. तो सेंट जेलेनी स्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रवेश नागदेवे नूतन सरस्वती हायस्कूलचा ९ व्या वर्गाचा विद्यार्थी होता.अजेशच्या वडिलांचे त्याच्या बालपणीच निधन झाले होते. त्याचे वडील डब्ल्यूसीएलमध्ये होते. वडिलांच्या जागेवर त्याच्या आईला डब्ल्यूसीएल प्लांट येथे नोकरी मिळाली होती. अजेश हरदासनगर येथील त्यांच्या आजोबाकडे शिकायला होता. दुसरा मृत प्रवेश याला दोन बहिणी आहेत. प्रवेशच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळतात हरदास नगर येथील नागरिकांनी महादेव घाटाकडे धाव घेतली. या दोघांचेही मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर