शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण झालेल्या भंडारा येथील चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:58 IST

गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. यामुळेच या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लसीमुळे तिचा मृत्यू झाला नसावा असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, परंतु सर्वांनाच शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. लसीकरणामुळे अत्यवस्थ झालेल्या दोन मुलापैकी १० वर्षीय मुलीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तर एक मुलगा भंडारा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा : गोवर-रुबेला लसीकरणाचा रुग्ण मेडिकलमध्ये दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. यामुळेच या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लसीमुळे तिचा मृत्यू झाला नसावा असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, परंतु सर्वांनाच शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. लसीकरणामुळे अत्यवस्थ झालेल्या दोन मुलापैकी १० वर्षीय मुलीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तर एक मुलगा भंडारा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.आराध्या वाघाये (११ महिने) रा. भंडारा असे मृताचे नाव आहे.विविध आजारांपासून बालकांचा बचाव व्हावा यासाठी राज्य शासनाने ‘रुबेला-गोवर’ लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबरपासून हाती घेतली आहे. ९ महिने ते १५ वर्षवयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. राज्यातील एकही बालक लसीकरणातून सुटू नये यासाठी राज्य शासनाने प्रत्येक विभागाला उद्दिष्ट दिले आहे. ८ डिसेंबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात ४ लाख १२ हजार ३०३ बालकांना लस देण्यात आली आहे तर विभागात नागपूरसह, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून १३ लाख ५ हजार ११२ मुलांना लस देण्यात आली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. एका लसीमुळे घातक असलेला गोवर व रुबेला रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, यामुळे लसीकरणासाठी पालकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. या दरम्यान विविध अफवा पसरल्या तरी त्याचा फारसा प्रभाव या मोहिमेवर पडलेला नाही. आराध्याचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचे अधिकारी सांगत असून शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे, त्यांचे म्हणणे आहे.प्राप्त माहितीनुसार, आराध्याला ५ डिसेंबर रोजी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली. ६ तारखेला तिची प्रकृती खालवली. यामुळे तिला ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून दुपारी १२ वाजता भंडारा सामान्य रुग्णालयात दुपारी २.३० वाजता नागपूर येथील मेडिकलमध्ये भरती केले. ७ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान आराध्याचा मृत्यू झाला. या घटनेला चार दिवस होत नाही तोच लसीकरण झालेल्या १० वर्षीय मुलीला मेडिकलच्या बालरोग विभागात तर एका मुलाला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.लसीकरण सूरक्षीतचआराध्याचा मृत्यू नंतर मेडिकलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. हा अहवाल येईपर्यंत काही बोलणे योग्य होणार नाही. गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. पालकांनी कुठलीही भीती बाळगू नये.डॉ. एस. उकेजिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

 

टॅग्स :Deathमृत्यूmedicineऔषधं