लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीतील आहे.रोशन छन्नूलाल लिल्हारे (२४) असे आरोपीचे नाव असून तो स्वामीनगर येथील रहिवासी आहे. त्याला भादंविच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास तर, कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत २ वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.मयताचे नाव मुनीश (२६) होते. ९ जून २०१५ रोजी आरोपीने मुनीशला मोटरसायकल मागितली. मुनीशने त्याला मोटरसायकल देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचे भांडण झाले. दरम्यान, आरोपीने मुनीशच्या डोक्यावर लाकडी बल्लीने जोरदार वार केला. त्यामुळे मुनीश गंभीर जखमी होऊन जाग्यावरच ठार झाला. त्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट केले.पोलीस तक्रारीनंतर आरोपीला १० जून रोजी गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. ज्योती वजानी व अॅड. राजेंद्र मेंढे यांनी बाजू मांडली.
सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:12 IST
सत्र न्यायालयाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीतील आहे.
सख्ख्या भावाचा खून करणाऱ्याला जन्मठेप
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय : मोटरसायकलवरून झाला होता वाद