शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांसोबत निष्पक्ष व्यवहार करा : आशा अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:22 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात करदात्यांमध्ये स्वच्छेने कर भरणा करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जनसंवादासाठी अधिकारी विभागाचा चेहरा आहे. सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी करदात्यांसोबत निष्पक्ष व्यवहार करावा, असे आवाहन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना येथे केले.

ठळक मुद्देएनएडीटीमध्ये पदोन्नत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात करदात्यांमध्ये स्वच्छेने कर भरणा करण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जनसंवादासाठी अधिकारी विभागाचा चेहरा आहे. सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी करदात्यांसोबत निष्पक्ष व्यवहार करावा, असे आवाहन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) प्रधान महासंचालक आशा अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना येथे केले.राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या देशातील १६९ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. उत्तरायण-२०१९ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. विभागाच्या विविध क्षेत्रांमध्ये नियुक्त होण्यापूर्वी अधिकाऱ्यांना आठ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.आशा अग्रवाल म्हणाल्या, अधिकाऱ्यांच्या व्यवहारामुळे जनसामान्यांच्या मनात विभागाची प्रतिमा अंकित होते. निष्पक्षता, तत्परता आणि पारदर्शक यासारख्या गुणांमुळे विभागाची प्रतिमा उत्कृष्टतेकडे नेता येते. त्याकरिता अधिकाऱ्यांमध्ये व्यवहार कौशल्य महत्त्वाचे आहे.प्रशिक्षणात कर संग्रहणाच्या मुख्य मुद्यासह करचोरीच्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासह काळ्या पैशाचा स्रोत, फसवणूक आणि विभिन्न वित्तीय घोटाळे आणि आर्थिक गुन्ह्याचा निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच डिजिटल फॉरेन्सिक, डेटा अ‍ॅनालिसिस, आधुनिक लेखा सॉफ्टवेअर आदींवर माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना शारीरिक फिटनेसवर भर देण्यात येणार आहे. निवासी प्रशिक्षणात एक आठवड्याच्या अभ्यासीय भारत दर्शनादरम्यान देशातील विविध सामाजिक आणि व्यापारिक क्षेत्राशी संपर्क साधून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जगातीत सर्वाेत्तम कर प्रणाली आणि एक आठवड्याच्या आंतरराष्ट्रीय कर प्रणाली प्रशिक्षणाचा समावेश आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या कौशल्यात वाढ होणार आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान राहणार आहे. यावेळी एनएडीटीचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NATIONAL ACADEMY OF DIRECT TAXESराष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीnagpurनागपूर