शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ती सात वर्षांची होती तेव्हा एका आजारामुळे तिला बहिरेपणा आला. बहिणीने तिला लिप रीडिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ती सात वर्षांची होती तेव्हा एका आजारामुळे तिला बहिरेपणा आला. बहिणीने तिला लिप रीडिंग शिकविले. त्या बळावर तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. एमपीएससी परीक्षा पास केली. नोकरी मिळविली. परंतु, बहिरेपणामुळे चूक घडू नये म्हणून तिच्या वडिलांनी तिला कॉक्लिअर इम्प्लांटसाठी तयार केले. या शस्त्रक्रियेसाठी खासगी नाहीतर मेयोसारख्या शासकीय रुग्णालयावर विश्वास दाखविला. इएनटी विभागातील डॉक्टरांनी प्रथमच ३५ वर्षीय महिलेवर कॉक्लिअर इम्प्लांट यशस्वी केले. 

    राज्यातील शासकीय रुग्णालयामधील ही पहिली शस्त्रक्रिया ठरली, असा डॉक्टरांचा दावा आहे. जिद्द आणि तंत्रज्ञानाची किमया म्हणून २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच आवाज ऐकणार आहे. शीतल लोणारे असे बहिरेपणाला हरविणाऱ्या महिलेचे नाव आहे. 

पहिला आवाज ऐकणार बहिणीचा  २८ वर्षांनंतर पहिला आवाज कोणाचा ऐकणार, या प्रश्नावर तिने बहीण मीनलकडे बोट दाखविले. ज्या बहिणीने मला कष्टाने लिप रीडिंग शिकविले, तिचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे आणि प्रत्युत्तर म्हणून तिला मीनल म्हणूनही हाक मारायचे असल्याचे तिने खाणाखुणा करून सांगितले. 

...अन् ऐकण्याची क्षमता गमावलीशीतल इयत्ता पहिलीत असताना गालफुगीमुळे तिने ऐकण्याची क्षमता गमावली. उपचारांनंतरही तिची श्रवणशक्ती परत आली नाही. तिचे वडील पुरणदास लोणारे यांनी मेयोमधील कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांच्याशी संपर्क साधला. मेयोमध्येच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

राज्यातील शासकीय रुग्णालयांत मेयोमध्ये पहिल्यांदाच प्रौढ व्यक्तीवर कॉक्लिअर इम्प्लांट झाले. पहिल्यांदाच ‘स्मार्ट नॅव्हिगेशन’ तंत्रज्ञानाचा वापर केला. शस्त्रक्रियेत कॉक्लिअर इम्प्लांटचा इनर पार्ट लावण्यात आला. दोन आठवड्यांनंतर आऊटर पार्ट लावण्यात येईल. त्यानंतर ती ऐकू शकणार आहे.डॉ. जीवन वेदी, प्रमुख इएनटी विभाग मेयो.

टॅग्स :Medicalवैद्यकीय