शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंधारलेल्या जीवनात प्रकाश पणती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 15:58 IST

नियतीची अवकृपा एखाद्यावर इतकी होते की, की त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आरतीवर सुद्धा नियतीची अशीच अवकृपा झाली. जन्मताच तिने दृष्टी गमावली आणि वयाच्या चौथ्या वर्षी तिने आई-वडिलांचे छत्र हरविले. पण कुठेतरी रक्ताच्या नात्यात ओलावा शिल्लक होता, त्यामुळे मामाने आरतीला आधार दिला अन् तिच्या हरविलेल्या आयुष्याला एक वळण मिळाले. आज दहावीचा निकाल लागला. यात आरतीने मिळविलेले यश हे तिने आपल्या अंधारलेल्या जीवनात पेरलेली प्रकाशाची पणतीच होय.

ठळक मुद्देनागपूरची  जन्मांध आरती दिव्यांगांमधून प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियतीची अवकृपा एखाद्यावर इतकी होते की, की त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आरतीवर सुद्धा नियतीची अशीच अवकृपा झाली. जन्मताच तिने दृष्टी गमावली आणि वयाच्या चौथ्या वर्षी तिने आई-वडिलांचे छत्र हरविले. पण कुठेतरी रक्ताच्या नात्यात ओलावा शिल्लक होता, त्यामुळे मामाने आरतीला आधार दिला अन् तिच्या हरविलेल्या आयुष्याला एक वळण मिळाले. आज दहावीचा निकाल लागला. यात आरतीने मिळविलेले यश हे तिने आपल्या अंधारलेल्या जीवनात पेरलेली प्रकाशाची पणतीच होय.आरती मानमोडे मूळची वर्धा जिल्ह्यातील मोहदापूरची. अपघातात आई-वडिलांचे छत्र हरविल्याने मामाच्या आधाराने ती नागपुरात आली. अंध विद्यालयाच्या श्रद्धानंदपेठ येथील वसतिगृहातून तिने शिक्षणाला सुरुवात केली. श्रद्धानंदपेठेतील कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल येथून तिने दहावीची परीक्षा दिली. आरती मुळात हुशारच. सोबत मेहनती आणि जिद्दी. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिला प्रगतीची पाऊलवाट सापडली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ही खूणगाठ तिने मनाशी बांधली. आपले अपंगत्व, शिक्षणात येणाऱ्या अडचणी या सर्वांवर तिने मात केली. शाळेच्या विद्या बचाले या शिक्षिकेचे मिळालेले मार्गदर्शन आणि वसतिगृहात अभ्यासासाठी उपलब्ध झालेले वातावरण, मामा जगदीश चोपडे यांचा पाठीवर असलेला हात त्यामुळे आरतीचा यशाचा मार्ग सुकर झाला.जन्मत:च अंध त्यातच आईवडिलांचे छत्र बालपणीच हरवलेले. अंध असतानाही मामाने दिलेला आपुलकीचा हात आणि गुरुजनांनी दाखविलेला जगण्याचा मार्ग, त्यामुळेच हा आनंद आज मी अनुभवत आहे.

 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर