शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर  जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:01 IST

समाजकल्याण सभापतीच्या कक्षातील टाईल्स या निकृष्ट बांधकामामुळे नाही, तर व्हायब्रेशनमुळे पडल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. बांधकाम विभागाच्या या अहवालामुळे जि.प.च्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देआता पडल्या टाईल्स... पुढे ? : बांधकाम विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समाजकल्याण सभापतीच्या कक्षातील टाईल्स या निकृष्ट बांधकामामुळे नाही, तर व्हायब्रेशनमुळे पडल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. बांधकाम विभागाच्या या अहवालामुळे जि.प.च्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.सभापती दीपक गेडाम यांच्या कक्षातील शौचालयातील टाईल्स अचानक कोसळल्या. त्यावेळी कक्षात असलेले सदस्य नाना कंभाले थोडक्यात बचावले. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केदार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. या कक्षात खिडकी व एक फॅन आहे. खिडकी व फॅनमुळे होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे टाईल्स पडल्याचा अहवाल दिला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केदार यांनी याची माहिती दिली. हे काम पात्रता कालावधीत असल्यामुळे त्याच्याकडून पुन्हा करवून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिसऱ्यांदा या टाईल्स पडल्या असतानाही कंत्राटदाराची कोणतीही जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. कंत्राटदाराला वाचविण्यासाठी टाईल्स पडल्याचे खापर खिडकीच्या व्हायब्रेशनच्या माथी फोडण्यात येत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरnagpurनागपूर