शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

डेंग्यूचा धोका, नागपुरात चार दिवसांत १८० रुग्ण

By सुमेध वाघमार | Updated: September 4, 2023 22:05 IST

दररोज ४६४ संशयित रुग्णांची भर : ४८ घरांना बजावली नोटीस

सुमेध वाघमारे 

नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालला आहे. मागील चार दिवसांत १८० नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. पावसाच्या उघडझापमुळे डासांचा प्रादूर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.    नागपूर शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या २ हजार ८४२ होती तर डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२४ होती. परंतु ४ सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्या २४०ने वाढली. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. रुग्ण आढळून आलेल्या व परिसरातील घरांची तपासणी करून किटकनाशक फवारणी, गप्पी मासे आणि जमा झालेले पाणी फेकून दिले जात आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने आज सोमवारी ४ हजार ८७९ घरांची तपासणी केली. त्यात ११० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. वारंवार अळ्या आढळून आलेल्या ४८ घरांना नोटीस बजावण्यात आली.

डेंग्यूच्या विळख्यात रोज १२ रुग्ण

जानेवारी ते ४ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या ४०४ झाली आहे. यावरून रोज डेंग्यूच्या विळख्यात रोज १२ रुग्ण सापडत असल्याचे दिसून येते. शिवाय रोज ४६४ संशयित रुग्ण आढळून येत आहेत. 

टॅग्स :nagpurनागपूरdengueडेंग्यू