शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उंच इमारतींमुळे विमानांना धोका : २९ इमारतींची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 20:40 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण झाला आहे. विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे.

ठळक मुद्देअद्यापही कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण झाला आहे. विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे.या समस्येवर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड आणि मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये पूर्वी बैठक झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे या इमारतींची पाहणी करण्यात येईल आणि उंचीचे उल्लंघन झाले असल्यास बांधकाम तोडण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. तसे पाहता विमानतळ परिसराच्या ठराविक अंतरावर बांधकाम करण्यात येणाºया इमारतींसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. प्राधिकरणाने विमानतळलगतच्या परिसरात इमारत बांधण्यासाठी उंची ठरवून दिली आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून उंच इमारत उभ्या राहिल्या आहेत. उंचीसाठी मालकाने प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली नाही. आता त्या विमानासाठी धोकादायक ठरल्या आहेत.अनेकदा सर्वेक्षणविमानतळालगतच्या उंच इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या गंभीर प्रश्नावर अनेकदा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणासह खासगी कंपनीतर्फेही इमारतींचे सर्वेक्षण करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. पण त्यानंतरही कारवाई झालेली नाही. मर्यादेपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामाला प्राधिकरणाने परवानगी दिलीच नाही. अशा स्थितीत कारवाईसाठी प्राधिकरणाचे अधिकारी कुणाची वाट पाहात आहेत वा कारवाई करणार किंवा नाही, यावरही संभ्रम असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेता येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरairplaneविमान