शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

पूर्व विदर्भातील धरणे आटली, आता प्रतीक्षा पावसाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 8:53 PM

उन्हाळा संपत आला आहे. कधी नव्हे इतकी तीव्र पाणीटंचाई यंदा निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठ्या धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. लवकर पाऊस न आल्यास भयावह परिस्थितीचा धोका लक्षात घेता नागरिकांसह शासन व प्रशासनालाही पावसाची तीव्रतेने प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देकेवळ ६ टक्के पाणीसाठा : ७ प्रकल्प कोरडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळा संपत आला आहे. कधी नव्हे इतकी तीव्र पाणीटंचाई यंदा निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठ्या धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. लवकर पाऊस न आल्यास भयावह परिस्थितीचा धोका लक्षात घेता नागरिकांसह शासन व प्रशासनालाही पावसाची तीव्रतेने प्रतीक्षा आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता २९५६४.४३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला (७ जून रोजी) केवळ १९०.८५ दलघमी (६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार एकूण १८ पैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. तोतलाडोह, नांद वणा, पुजारी टोला दिना, पोथरा, गोसीखुर्द टप्पा १ आणि बावनथडी या प्रकल्पांमध्ये ० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३५ दलघमी (२४.५७ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये ७.८८ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १२.४१ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १६.८५ टक्के, सिरपूर १८.८५ टक्के, पुजारी टोला ० टक्के, कालीसरार ४६ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये २.७७ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात २६.२० टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १०.९० टक्के, धाममध्ये ०.७४ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये २.९७ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष (७ जून रोजी)      नोंदवलेला पाणीसाठा२०१९- १९०.८५ दलघमी२०१८ - ३८१.५९ दलघमी२०१७ - ३११.४४ दलघमी२०१६ - ६८५.८६ दलघमी२०१५- ७३६.०५ दलघमी२०१४ - १४७६.२६ दलघमी