शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:24 IST

गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपूरकरांनो पाणी जपूनच वापरा : नवेगाव खैरीमध्ये दोन आठवड्यात केवळ ०.२४ मीटर वाढला साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.सोमवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तलावांमधील पाणीसाठ्यावर चर्चा झाली. पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नसल्याने पाणीकपातीचा निर्णय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ ऑगस्टपर्यंत कपातीचा निर्णय अगोदरच घेण्यात आलेला आहे. परंतु दर आठवड्याला आढावा घेण्याचा पर्यायसुद्धा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार आढावा घेतल्यानंतर कपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची पातळी २९ जुलै रोजी ३१८.६० मीटर इतकी होती. दोन आठवड्यापूर्वी १५ जुलै रोजी ती ३१८.३६ मीटर इतकी होती. यात केवळ ०.२४ मीटरची वाढ झाली आहे. ती समाधानकारक नाही. गेल्यावर्षी याच तारखेला धरणातील पाण्याची पातळी ३२२ मीटरपेक्षा अधिक होती. नवेगाव खैरीतून पेंचच्या माध्यमातून नागपूरच्या जलशुद्धीकरण केंद्रात दररोज ५०० एमएलडी पाणी येते. पाण्याची पातळी वाढत नसल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला.जलप्रदाय समितीचे सभापती झलके यांनी सांगितले की, शहरात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. परंतु तलाव परिसरात पाणी नसल्याने तेथील पाणीसाठ्यात फारसा फरक पडलेला नाही. नवेगाव खैरीतील तलावात पाणी नाही आणि तोतलडोह तलावातील परिस्थितीतही सुधारणा नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.पाण्याचे टँकरही बंदपाणीसंकटादरम्यान कुठल्याही टाकीतून टँकरचे संचालन होणार नाही. त्यामुळे कपातीच्या एक दिवसापूर्वीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. कपातीदरम्यान पाण्याच्या टाकीतही पाणी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे टँकर चालू शकत नाही.पाणीटंचाईबाबत ‘सोशल मीडिया’तून जनतेशी संवाद : बावनकुळेसद्यस्थितीत नागपूर शहरात पाणीकपात करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, पाण्याचे संकट हे नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत तोतलाडोहमध्ये पुरेसे पाणी येत नाही, तोपर्यंत नागपूर शहरात पाणीकपात सुरूच राहणार. जनतेला या संकटाची जाण आहे. लोक सुशिक्षित असून ते संयम बाळगत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संकटांची कारणे पटवून सांगू, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी चौराईविरोधात अवाक्षर काढले नाही. आता आंदोलन कसे काय करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.

टॅग्स :water shortageपाणीकपातnagpurनागपूर