शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

देशातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे! नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 21:35 IST

आज देशभरातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे लागले असून, त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आवाका सांस्कृतिक क्षेत्रातून वाढविण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

ठळक मुद्दे सांस्कृतिक क्षेत्रातून आंबेडकरी चळवळ वाढवाआंबेडकर नाट्य महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मोठ्या प्रमाणात सामाजिक अभिसरण निर्माण करणाऱ्या चळवळींनी जोर धरला आहे. आज देशभरातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे लागले असून, त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आवाका सांस्कृतिक क्षेत्रातून वाढविण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.सम्यक थिएटरच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात द्विदिवसीय ‘आंबेडकर नाट्य महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगीत राऊत बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील रामटेके उपस्थित होते.बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर उपेक्षित वर्गाने आपल्या वेदना मांडण्यासाठी पोवाडे व नाटकांचा आधार घेतला. नागपूर हे या चळवळीचे केंद्र बनले असून, संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरकडे लागले आहे. त्यामुळे, चळवळीतील कलाकृतींचा आवाका वाढविण्यासाठी व येथील दलित कलाकृती दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथे सादर करण्याची संधी सरकारतर्फे दिली जाईल, अशी घोषणा राऊत यांनी केली. जम्मूमध्ये दलित समाज मोठा आहे परंतु, त्यांना बाबासाहेबांविषयी माहिती नाही. त्या भागात प्रशासकीय सेवेतील लोक बाबासाहेब समजावून सांगत आहेत. चळवळीला टिकवून ठेवणे कठीण असते. त्याचे प्रत्यंतर आंबेडकरी चळवळीतून मोठे झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या वेगवेगळ्या चुलींवरून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले. आंबेडकरी चळवळीला वेग देण्यासाठी पुढाकार घेऊ व जिल्हाधिकारी फंडातून या उपक्रमांसाठी वेगळा निधी उपलब्ध करवून देण्याची घोषणा त्यांनी केली. सोबतच या महोत्सवासाठी नऊ लाख रुपये मिळवून देण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवाय लहान संस्थांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, डॉ. सुनील रामटेके यांचे बिजभाषण झाले. प्रास्ताविक नरेश साखरे यांनी केले. संचालन अशोक जांभूळकर यांनी केले तर आभार किरण काशिनाथ यांनी मानले. याप्रसंगी इ.मो. नारनवरे, डॉ. नीलकांत कुलसंगे, प्रभाकर दुपारे, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, कमल वाघधरे, डॉ. सतीश पावडे, चंदा गोटे-कुलसंगे, तक्षशिला वाघधरे, वंदना जिवने, मीनाक्षी बोरकर या ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :NatakनाटकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNitin Rautनितीन राऊत