शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल सुबत्ता : सुनिल केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 11:35 IST

विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे सुनील केदार म्हणाले.

ठळक मुद्देअॅग्रो व्हिजनमध्ये 'विदर्भात दुग्ध व्यवसायाच्या संधी' विषयावर परिषद

नागपूर : बाटली बंद पिण्याचे पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी परिस्थिती राहिल्यास दूध उत्पादनात वाढ कशी होईल? दुग्ध व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले तर आपोआप शेतकऱ्यांचा या व्यवसायाकडे कल वाढेल. त्यामुळे दुधाला चांगला दर मिळण्यासाठी बाजारपेठेत दुधाची मागणी वाढणे आवश्यक आहे. याकरिता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मदर डेअरीच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी नागपुरात केली.

नागपुरात २४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या ॲग्रो व्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीअंतर्गत ‘विदर्भातील डेअरी उद्योगाचा विकास’ या विषयावर शनिवारी झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. दुग्धव्यवसायात वाढ करण्याबाबत राज्य स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र देशात दुधाची भुकटी तयार करणारा मोठा प्रदेश आहे. डेअरी इंडस्ट्रिज आता ग्लोबल होत असून अनेक मोठ-मोठ्या कंपन्या या व्यवसायाचे नेतृत्व करीत आहे. विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे केदार म्हणाले.

विदर्भात दुग्ध यातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोठी संधी आहे. दुधाच्या उत्पादनाला विदर्भात वाव असला तरी शेतकऱ्यांपुढे असलेल्या समस्या अधिकाऱ्यांनी समजून त्या दूर कराव्या. मार्केटिंग आणि प्रोसेसिंग महत्त्वाचे असल्याने ही सुविधा दूध उत्पादकांपर्यंत पोहचविण्यात अधिकाऱ्यांनी कमी पडू नये, अशी अपेक्षा केदार यांनी व्यक्त केली.

दुधाचा टक्का अजूनही मागे : गडकरी

दूध उत्पादनातील विदर्भाचा टक्का अजूनही मागे असल्याची खंत ॲग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात दुधाने क्रांती होण्याची गरज आहे. त्यासाठी नव्या प्रजातीच्या आणि अधिक दूध देणाऱ्या गायींची पैदास वाढायला हवी, असे गडकरी म्हणाले.

विदर्भात दुग्ध व्यवसाय वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, मदर डेअरी आणि राज्य शासनाच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाला अधिक गती देऊन प्रत्येक गावामध्ये मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलन करण्यासाठी प्रयत्न करावे. आगामी काळात विदर्भात दुग्ध क्रांती घडविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, मदर डेअरी यांनी अधिक प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशा सूचना गडकरी यांनी केल्या.

राज्याचे दूध संकलन ५ लाख लिटरवर पोहचवायचेय : मिनेश शहा

राज्याचे दूध संकलन सख्या २ लाख लिटर प्रतिदिन आहे. ते ५ लाखावर पोहचविण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी विदर्भावरही अधिक भर राहणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दुधाचा जोडधंदा महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दूध विकास मंडळाचे अध्यक्ष मिनेश शहा यांनी केले.

शहा म्हणाले, राष्ट्रीय दूध विकास मंडळाने २०१६ पासून विदर्भासाठी योजना सुरू केली. विदर्भातील ५ आणि मराठवाड्यातील ६ अशी १२ गावे प्रारंभी या योजनेत जोडली. आज विदर्भातील ७ आणि मराठवाड्यातील ४ असे ११ जिल्हे व त्यातील २,७०० गावे या योजनेत सहभागी आहेत. एक कोटीवर रक्कम या प्रकल्पावर खर्च झाली असून १४ हजार ७०० शेतकऱ्यांना या योजनेला लाभ झाल्याची माहिती त्यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील ४० गावांमध्ये राबविलेल्या पायटल प्रोजेक्टमधून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढल्याचे लक्षात आल्याने विदर्भातील ४०० पेक्षा अधिक गावे या योजनेत सहभागी केली जाणार असल्याचे शहा यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीmilkदूधSunil Kedarसुनील केदारNitin Gadkariनितीन गडकरी