बेला परिसरात दाेघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST2021-03-29T04:06:59+5:302021-03-29T04:06:59+5:30

बेला : दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये दाेघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना बेला पाेलीस ठाण्यांतर्गत शनिवारी (दि.२७) उघडकीस आल्या. ...

Dagha commits suicide in Bella area | बेला परिसरात दाेघांची आत्महत्या

बेला परिसरात दाेघांची आत्महत्या

बेला : दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये दाेघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना बेला पाेलीस ठाण्यांतर्गत शनिवारी (दि.२७) उघडकीस आल्या.

बेला परिसरातील पूर्ती साखर कारखाना येथील क्वाॅर्टरमध्ये याेगेश शिवाजी लांडे (३१, रा. पारस, जि. अकाेला, हल्ली मु. साखर कारखाना क्वाॅर्टर) या तरुण कामगाराने राहत्या घरी नायलाॅन दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. महेश महादेव टापरे (२५, रा. वाॅर्ड क्र. ५, बेला) यांच्या तक्रारीवरून बेला पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस अंमलदार गणेश पाल करीत आहेत.

दुसरी घटना बेलानजीकच्या पिपरा शिवारात शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मंगेश गणपतराव घाेडमारे (३० , रा. शेगाव, ता. वराेरा, जि. चंद्रपूर हल्ली मु. पिपरा) याने किशाेर वसंतराव कारमाेरे (४१, रा. पिपरा, ता. उमरेड) यांच्या शेतात गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी किशाेर कारमाेरे यांच्या तक्रारीवरून बेला पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस अंमलदार अजय चाैधरी करीत आहेत.

Web Title: Dagha commits suicide in Bella area